ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. ११ - सात उच्च न्यायालयाच्या ७१ अतिरिक्त न्यायाधीशांची शुक्रवारी कायमस्वरुपी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अजित सिंह यांना गुवहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून बढती देण्यात आली. पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सतीश कुमार मित्तल यांची राजस्थान उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदावर नियुक्ती करण्यात आली.
सात उच्च न्यायालयांच्या 71 न्यायाधीशांची कायमस्वरुपी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई, कोलकाता, आंध्रप्रदेश, तेलंगणा, केरळ, छत्तीसगड, कर्नाटक आणि पाटणा येथील उच्च न्यायालयांचा समावेश आहे.
मुंबईमधील 29, कोलकातामधील 13, आंधप्रदेश / तेलंगणामधील 11, केरळ आणि छत्तीसगडमधील प्रत्येकी 6, कर्नाटकमधील 5 आणि पाटणामधील एक न्यायाधीशांचा यात समावेश आहे. राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अजित सिंग आणि पंजाब, हरियणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सतीश कुमार मित्तल यांची गुवाहाटी आणि राजस्थान उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे.