नवी दिल्ली : विधानपरिषदेवर राज्यपालांनी नियुक्त करावयाच्या १२ आमदारांच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी शुक्रवारीही होऊ शकली नाही. आता या प्रकरणी ४ जुलै रोजी सुनावणी होणार असून तोपर्यंत आमदारांच्या नियुक्त्यांवरील स्थगिती आदेश कायम राहणार आहेत.
राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मविआ सरकारने पाठवलेल्या यादीवर तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोणताही निर्णय घेतला नव्हता. गेल्यावर्षी सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठवलेली नवी यादीही न्यायालयाच्या स्थगितीत अडकली आहे.