लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : नवीन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्यापासून २०२३ च्या कायद्यानुसार केंद्राला रोखण्याची मागणी करणारी याचिका काँग्रेसनेसर्वोच्च न्यायालयात दाखल केली. ही याचिका लवकरात लवकर सुनावणीसाठी घेण्याचा विचार केला जाईल, असे न्यायालयाने सोमवारी सांगितले.
या कायद्याच्या तरतुदींना याचिकेत न्यायालयात आव्हान दिले आहे. काँग्रेस नेत्या जया ठाकूर यांच्यावतीने वकील विकास सिघ आणि वरुण ठाकूर यांनी ही याचिका दाखल केली.
सध्या आयोगात एकमेव सदस्य
- नवीन निवडणूक आयुक्तांची नावे निश्चित करण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीची १५ मार्च रोजी बैठक होणार आहे. मतदान समिती लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करणार असताना काही दिवस आधी गोयल यांनी शुक्रवारी सकाळी राजीनामा दिला.
- त्यांचा राजीनामा शनिवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला आणि केंद्रीय कायदा मंत्रालयाने त्याची घोषणा करण्यासाठी अधिसूचना जारी केली. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे समितीचे एकमेव सदस्य आहेत.