नवी दिल्ली - केंद्र सरकारने सॉलिसिटर जनरल पदावर पुन्हा एकदा तुषार मेहता यांची नियुक्ती केली आहे. सद्यस्थितीत त्यांच्याकडेच ही जबाबदारी होती. आता, नवीन आदेशानुसार १ जुलै २०२३ पासून नवीन नियुक्ती लागू होत आहे. निवड समितीच्या आदेशानुसार, विक्रमजीत बनर्जी आणि केएम नटराज यांना अॅडिशनल सॉलिसिटर जनरल (सुप्रीम कोर्ट) या पदावर नियुक्त करण्यात आलं आहे. त्यांनाही १ जुलैपासून नियुक्ती आदेश प्राप्त झाले आहेत.
तुषार मेहतांच्या नियुक्ती आदेशासह बलबीर सिंह, एसवी राजू, एन. वेंकटरमन आणि ऐश्वर्या भाटी यांना अॅडिशनल सॉलिसिटर जनरल (सुप्रीम कोर्ट) या पदावरील नियुक्तीस मंजुरी देण्यात आली आहे. या सर्वांची नियुक्ती ही आज म्हणजेच ३० जूनपासून लागू करण्यात येत आहे. या सर्व नवनियुक्त सॉलिसिटर जनरला यांचा कार्यकाळ पुढील ३ वर्षे किंवा पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार आहे.