हरीश गुप्ता नवी दिल्ली : सचिवांची रिक्त असलेली पदे भरण्यात आली असून, मध्यप्रदेशातील आयएएस अधिकारी दीपक खांडेकर यांची कार्मिक विभागात नवे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते अजय भल्ला यांची जागा घेतील. भल्ला यांच्याकडे गृहसचिवपदासह कार्मिकचा पदभार होता. डॉ. सी. चंद्रमौळी हे निवृत्त झाल्यापासून भल्ला हे काही महिन्यांपासून दुहेरी जबाबदारी सांभाळत होते.काही महिन्यांपासून सचिवपदे रिक्त होती. कार्मिक मंत्रालय हे थेट पीएमओच्या अंतर्गत येते. नियुक्त्या, बदल्यांशी ते संबंधित आहे. खांडेकर हे यापूर्वी आदिवासी विभागाच्या मंत्रालयात सचिव होते.
अन्य एका महत्त्वाच्या बदलांमध्ये सुखबीरसिंग संधू यांना सचिवपदावर पदोन्नती देण्यात आली आहे, तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अध्यक्ष म्हणून कायम राहतील. बिद्युत बिहारी स्वाइन हे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या मंत्रालयाचे नवे सचिव असतील. ते ए.के. शर्मा यांची जागा घेतील. शर्मा यांनी नुकताच राजीनामा दिलेला आहे आणि ते आता उत्तर प्रदेशातून विधान परिषदेवर सदस्य झाले आहेत. हे दोन्ही विभाग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अंतर्गत येतात. उपेंद्र प्रसाद सिंग (वस्त्रोद्योग), राजेश के. चतुर्वेदी (खते), योगेंद्र त्रिपाठी (रसायन आणि खते), आलोक कुमार (वीज) आणि आलोक टंडन (खाण), तसेच जी.व्ही. वेणुगोपाल सरमा हे रासायनिक शस्त्रे, राष्ट्रीय प्राधिकरणाचे नवे अध्यक्ष असतील, तर पंकज कुमार जल संसाधन, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाचे काम पाहणार आहेत.
प्रवीण श्रीवास्तव हे कॅबिनेट सचिवालयाचे सचिव (समन्वय), तर अरविंद सिंग हे १९८८ च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे अधिकारी पर्यटन मंत्रालयाचे नवे सचिव असतील. अलका तिवारी या राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या नव्या सचिव असतील. प्रवीण श्रीवास्तव हे कॅबिनेट सचिवालयाचे सचिव (समन्वय), तर अरविंद सिंग हे १९८८ च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे अधिकारी पर्यटन मंत्रालयाचे नवे सचिव असतील. अलका तिवारी या राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या नव्या सचिव असतील.