मुंबई : उत्तर प्रदेशात कोरोनाचा बिमोड करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उचलेल्या पावलांचे देशभरात सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. विशेषत: लॉकडाऊनमध्ये हॉट स्पॉट क्षेत्रात येथील नागरिकांना जीवनाश्यक साहित्य मिळेल; याची काळजी घेण्यात आली. येथील परिसरात जंतुनाशके फवारण्यात आली. घरोघरी जाऊन चाचणी करण्यात आली. परिणामी, येथे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश येत आहे, असा दावा केला जात आहे. आणि अशा प्रकाराच्या उपाय योजना देशभरात लागू करण्यात याव्यात, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
उत्तर प्रदेश सरकारने कोरोनाला थोपविण्यासाठी येथे वैद्यकीय सेवा सुविधा, सॅनिटायझेशन, घरोघरी जाऊन चाचणी करणे आणि जनजागृती करणे आदी उपाय केले आहेत. येथे जे क्षेत्र हॉट स्पॉट म्हणून निश्चित करण्यात आले होते; त्या क्षेत्रात मेडीकल टीम पाठविण्यात आली. घरोघरी चाचण्या करण्यात आल्या. संपूर्ण क्षेत्रात जंतुनाशके फवारण्यात आली. लॉकडाऊनचे नियम सक्तीने पाळण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे, या काळात येथील नागरिकांना जीवनाश्यक साहित्य मिळेल; याचीही काळजी घेण्यात आली. जेथे जेथे कोरोनाचे रुग्ण आढळत होते; तेथे तेथे प्रवेश नाकारण्यात आला. आत येणारे, बाहेर जाणारे रस्ते बंद करण्यात आले. प्रत्येकाने घरात थांबावे यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. लोकांनी बाहेर येऊ नये म्हणून त्यांना घरातच दूध, भाजी, फळे, रेशन पुरविण्यात आले. लॉकडाऊन तुटणार नाही याची काळजी घेतली जात आहे. प्रत्येक हॉट स्पॉटसाठी एक पोलीस अधिकारी नेमण्यात आला. पाण्यात औषध टाकत अग्निशमन दलाकडून फवारणी केली जात आहे.कोरोनाबाधितांच्या संपर्कात जे लोक आले होते; त्यांच्याही चाचणी घेतल्या जात आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर का कोणी घरातून बाहेर पडले तर कायदेशीर कारवाई केली जात आहे. कोरोनाचा प्रसार होणार नाही यासाठी आवश्यक पाऊले उचलली जात आहे. विशेषत: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येथील प्रत्येक गोष्टीचा आढावा घेत आहेत.येथे घेतली जात आहे काळजीआग्रा, फिरोजाबाद, कानपूर नगर, बस्ती, महराजगंज, बरेली, गाजियाबाद, बुलंदशहर, मेरठ, शामली, सहारनपूर, सीतापूर, वाराणासी, गौतमबुद्ध नगर येथील परिसरात लॉकडाऊन नीट पाळण्यात येत आहे. जेथे जेथे कोरोनाबाधित व्यक्ती आढळत आहेत; त्यांना क्वॉरंटाईन करण्यात येत आहे. हाथरस, मथुरा, औरैया, प्रतापगढ, बांदा, कौशाम्बी, प्रयागराज, पीली•ाीत, मुरादाबाद, शाहजहांपूर, बदायू, रामपुर, अमरोहा, बागपत, हापुड, मुजफ्फनगर, लखीमपुर खीरी, हरदोई, रायबरेली, बाराबंकी, जौनपुर, गाजीपुर, आजमगढ, मिर्जापूर अशा प्रत्येक ठिकाणी पुरेशी काळजी घेतली जात आहे.ं