शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

प्रशंसा गडकरींची, संकट सभापती धनखड यांच्यापुढे; मंत्रालयाशी संबंधित पुरवणी प्रश्नावरून ‘व्यथा’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2023 8:45 AM

ही प्रशंसा केवळ भारतापुरती मर्यादित नाही. आपण तीनवेळा परदेशी गेलो, तिथला अनुभव आपण सांगू शकतो, असे सभापती धनखड म्हणाले. गडकरी यांची प्रशंसा तर भरपूर झाली. पण, त्यांनी माझ्यापुढे संकट उभे केले आहे. 

सुनील चावके -

नवी दिल्ली : केंद्रीय राष्ट्रीय राजमार्ग आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाची बुधवारी प्रश्नोत्तरांच्या तासात राज्यसभेत सभापती जगदीप धनखड यांच्यासह सदस्यांनी बाके वाजवून प्रशंसा केली. गडकरींची प्रशंसा केवळ भारतापुरतीच मर्यादित नसून ती परदेशातही ऐकायला मिळते, अशी प्रशस्ती सभापती धनखड यांनी दिली. गडकरींच्या मंत्रालयाशी संबंधित इतके पुरवणी प्रश्न येतात की, आपल्यापुढेही संकट उभे ठाकते, अशी ‘व्यथा’ही धनकड यांनी बोलून दाखवली. 

ही प्रशंसा केवळ भारतापुरती मर्यादित नाही. आपण तीनवेळा परदेशी गेलो, तिथला अनुभव आपण सांगू शकतो, असे सभापती धनखड म्हणाले. गडकरी यांची प्रशंसा तर भरपूर झाली. पण, त्यांनी माझ्यापुढे संकट उभे केले आहे. 

त्यांच्या मंत्रालयाशी संबंधित इतके पुरवणी प्रश्न आले आहेत, की मला पुरवणी प्रश्नांची मर्यादा वाढवूनही अनेक प्रश्न शेवटी मागे ठेवावे लागले. सदस्यांच्या पुरवणी प्रश्नांविषयीच्या विनंत्यांचा आपण पुढच्या वेळी अधिक सक्रियतेने विचार करू, असे सभापती धनकड म्हणाले.  

मुंबई ते गोवा प्रकल्पावर पुस्तक लिहिता येईलसिधी - सिंगरौलीच्या दीर्घकाळापासून रखडलेल्या रस्त्याची समस्या सुटली नसल्यामुळे त्याविषयीच्या प्रश्नाचे उत्तर देताना मनात अपराधभाव निर्माण होतो. देशात मुंबई ते गोवा आणि सिधी - सिंगरौलीच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांवर पुस्तक लिहिले जाऊ शकते. या दोन्ही प्रकल्पांमध्ये इतक्या कायदेशीर अडचणी आल्या की, त्यामुळे प्रकल्पांचे काम पूर्णत्त्वाला जाऊ शकले नाही आणि जनतेला अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही बाब दुर्भाग्यपूर्ण आहे, याशिवाय आपल्यापाशी कोणतेही उत्तर नाही, असे गडकरी म्हणाले.

५९ हजार ७२२ कोटींचे गतिशक्ती प्रकल्पपंतप्रधान मोदी यांनी २०२०-२१ मध्ये केलेल्या पीएम गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनच्या घोषणेनंतर महाराष्ट्रात ३३९४ कि. मी. लांबीच्या ५९ हजार ७२२ कोटींच्या १४६ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांना मंजुरी  देण्यात आली असून, या प्रकल्पांवर आतापर्यंत ३७ हजार ७८३ कोटी रुपये खर्च झाले असल्याची माहिती केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपचे खासदार अनिल बोंडे यांच्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाNitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपा