नवी दिल्ली : भारतीय हवाई दलासाठी हिंदूस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडकडून ८३ मार्क-१ तेजस लढावू विमाने विकत घेण्याच्या व्यवहाराला संरक्षणाशी संबंधित मंत्रिमंडळ समितीने मंजुरी दिली आहे. हे विमान स्वदेशी बनावटीचे असून हा व्यवहार ४८ हजार कोटी रूपयांचा आहे. भारतीय हवाई दलाचे सामर्थ्य वाढवण्यासाठीचा हा निर्णय आहे.
तेजस मार्क-१ विमानांचा पुरवठा येत्या फेब्रुवारी महिन्यात या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर तीन वर्षांनी सुरु होईल. तेजसच्या नव्या आवृत्तीत ४३ बदल करण्यात येणार असून भारतीय हवाई दलाने हिंदुस्तान एरोनॉटिक्सला आधीच ४० ‘तेजस मार्क १’ विमानांची ऑर्डर दिली आहे. ‘तेजस मार्क-१ ए’ आधीच्या ‘तेजस मार्क १’ पेक्षा अधिक अत्याधुनिक आणि घातक असेल.