नवी दिल्ली : भारतीय रेल्वेतील ‘क’ आणि ‘क’ वर्गाच्या ८९ हजार पदांसाठी दीड कोटी उमेदवारांनी आॅनलाइन अर्ज भरले. अर्ज भरण्याची मुदत ३१ मार्च असल्याने ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.रेल्वेतील वरिष्ठ सूत्रांच्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात या उमेदवारांनी रेल्वे भरती मंडळाकडे प्राथमिक नोंदणी केली आहे. दुसऱ्या टप्प्यात पात्रता छाननी होऊन शुल्क भरल्यानंतर परीक्षेसाठी बसणाºया उमेदवारांची नेमकी संख्या स्पष्ट होईल. रेल्वेत एकाच वेळी केली जाणारी आजवरची ही सर्वातमोठी नोकरभरती आहे. त्यात ‘क’ वर्गातील २६,५०२ व ‘ड’ वर्गातील ६२,९०७ पदे भरली जायची आहेत. पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार उमेदवारांची निवड मुलाखती न घेता फक्त लेखी परीक्षेने केली जाईल. यासाठी आॅनलाइन लेखी परीक्षा एप्रिल किंवा मेमध्ये होण्याची शक्यता आहे.
रेल्वेतील भरतीसाठी आले दीड कोटी अर्ज, जागा केवळ ८९ हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 4:27 AM