ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली,दि.12- केंद्र सरकारने महागाईला आळा घालण्यासाठी आणि एमआरपीच्या नावाखाली मनमानीकरून ग्राहकांची फसवणूक करणा-यांविरोधात पावलं उचलायला सुरूवात केली आहे.
एमआरपीच्या नावाखाली मनमानीकरून विक्री करणाऱ्या दुकानदारांना सरकार चाप लावणार आहे. दूध,तेल,साखर,डाळ अशा जीवनावश्यक खाद्यपदार्थांचे दर सरकार स्वतः ठरवणार आहे.
निश्चित केलेल्या दरांपेक्षा एखाद्या दुकानदाराचा मनमानीपणा सुरुच असेल तर त्यासाठी शिक्षेची तरतूद केली गेली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नियमांचं उल्ल्ंघन करणा-याला 5 हजार रूपयांचा दंड आणि त्याच्या सामानावर जप्ती येऊ शकते.