शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्याच पोस्टिंगवर रुजू होण्यासाठी निघालेले; आयपीएस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू
2
विधानसभेत मी मैदानात असतो आणि समीकरणं जुळली असती तर...; जरांगेंचा नव्या सरकारला इशारा
3
"त्यांनी मुख्यमंत्र्यांची सभा सुद्धा रद्द केली"; संजय गायकवाडांच्या आरोपांना केंद्रीय मंत्री जाधवांचं प्रत्युत्तर
4
२० जिल्ह्यातील शेतकरी दिल्लीकडे करणार कूच; चिल्ला बॉर्डरवर वाहतूक कोंडी, पोलीस अलर्ट
5
'पुष्पा २'साठी पुन्हा एकदा श्रेयस तळपदे बनला अल्लू अर्जुनचा आवाज, म्हणाला- "फ्लॉवर नहीं, फायर है मेंपासून..."
6
मुंबई-मँचेस्टर विमानाचे कुवैतमध्ये इमर्जन्सी लँडिंग; ६० भारतीय १३ तास अडकले
7
आर्यन-अबराम यांची नावं बोल्डमध्ये पण श्रेयसला दुय्यम स्थान! 'मुफासा'चं पोस्टर पाहून भडकला मराठी अभिनेता
8
९५ चेंडूत ५ धावा खर्च करत ४ विकेट्स! या गोलंदाजानं उमेश यादवचा रेकॉर्ड मोडला, पण..
9
सत्तेच्या बाहेर राहण्याचा एकनाथ शिंदेंचा विचार, परंतु...; भरत गोगावलेंचं विधान
10
निकालानंतर ठाकरे गटाचा पुन्हा हिंदुत्वाचा नारा; छत्रपती संभाजीनगरात करणार आंदोलन
11
'या' सरकारी कंपनीनं मुंबईत केली पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ; पाहा काय आहेत नवे दर?
12
थंडी पळाली, राज्यात २-३ दिवस पावसाची शक्यता; काही जिल्ह्यांना यलो अलर्ट...
13
एक महिन्याच्या कालावधीतच गूड न्यूज कळेल; निलेश लंकेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण
14
एकेकाळी सायकलवरून फिरून नमकीन विकले, आता ५५३९ कोटींची आहे कंपनी; काय आहे व्यवसाय?
15
Fimfare OTT Awards: करीना कपूर ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा! वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
16
मुसळधार पावसामुळे भूस्खलन! एकाच कुटुंबातील सात जण चिखलाच्या ढिगाऱ्याखाली दबले
17
आराध्या बच्चनचा १३ वा वाढदिवस, दोन वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये दिसले अभिषेक-ऐश्वर्या
18
Stock Market Updates: शेअर बाजाराच्या आठवड्याची सुरुवात रेड झोनमध्ये; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
19
बायडेननी जाता जाता शब्द मोडला; चेन स्मोकर मुलाला गंभीर गुन्ह्यांतून दोषमुक्त केले
20
"मला विचारा, एक एक डायलॉग...", कपिल शर्माने KBC चा उल्लेख करताच रेखाची प्रतिक्रिया

"भाजपचे नेते लाल किल्ला, ताजमहाल, कुतुब मीनारही तोडणार आहेत का?"; खरगेंचा भाजपला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2024 8:33 AM

दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी भाजपवर टीकास्त्र डागलं. 

संभल येथील शाही जामा मशीद आणि अजमेर येथील शरीफ दर्गा मुद्दा तापला आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वावर निशाणा साधला. भाजप देशातील मशि‍दींचे सर्वेक्षण करून समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप खरगे यांनी केला. असे करून भाजप सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भूमिकेलाच विरोध करत आहे, असेही ते म्हणाले. 

दिल्लीतील रामलीला मैदानात दलित, अल्पसंख्याक, आदिवासी आणि ओबीसी यांच्या एका संघटनेच्या वतीने रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीत बोलताना मल्लिकार्जून खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र डागलं. 

लाल किल्ला, ताजमहालही पाडणार का?

भाजपला लक्ष्य करताना मल्लिकार्जून खरगे म्हणाले म्हणाले, "भाजपचे नेते लाल किल्ला, ताजमहाल, कुतुब मीनार किंवा चार मीनार सारख्या वास्तूही पाडणार आहेत का? ज्या मुस्लिमांनी बांधल्या आहेत."

उत्तर प्रदेशातील संभलमध्ये मशि‍दीच्या सर्वेक्षणावरून हिंसा झाली. त्या पार्श्वभूमीवर खरगे यांनी हे विधान केले. संभलमधील शाही जामा मशि‍दीच्या ठिकाणी पूर्वी मंदिर होते, असा दावा करण्यात आला आहे. त्याच्या पाहणीसाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. 

खरगेंची मोदींवर टीका

मल्लिकार्जून खरगे यांनी म्हटले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वसामान्य माणसांविरोधात आहेत. कारण ते लोकांचा तिरस्कार करतात. आमची लढाई त्या द्वेषाविरोधात आहे आणि त्यामुळे राजकीय शक्ती महत्त्वाची आहे."

"प्रत्येक ठिकाणी सर्वेक्षण केले जात आहे. मशि‍दींच्या खाली मंदिरं शोधली जात आहेत. तशी मागणी जोर धरत आहे. पण, २०२३ मध्ये आरएसएस नेते मोहन भागवत यांनी म्हटले होते की, आमचा उद्देश राम मंदिर निर्माण करणे हे होते आणि आम्हाला मशि‍दींच्या खाली मंदिर शोधायची नाहीत", असे म्हणत खरगेंनी भाजपवर निशाणा साधला. 

खरगे म्हणाले, "आपण सगळे एक आहोत आणि तुम्हा सगळ्यांची हीच इच्छा आहे. नरेंद्र मोदी म्हणतात की, एक हैं तो सेफ है. पण, ते कुणालाही सुरक्षित जगू देत नाहीयेत. सत्य हेच आहे की, मोदीच फूट पाडत आहेत", अशी टीका खरगेंनी केली. 

टॅग्स :congressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी