नवी दिल्ली - मशिदींवरील लाऊडस्पीकरमुळे ध्वनीप्रदूषण होते का, याबाबत तपास करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत. पूर्व दिल्लीतील सात मशिदींवर लाऊडस्पीकर लावण्यात आले आहेत. या लाऊडस्पीकरमुळे ध्वनीप्रदुषण होत असल्याची तक्रार हरित लवादाकडे करण्यात आली होती. त्यानंतर, हे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या ध्वनी प्रदूषणामुळे हरित लवादाच्या नियमांच्च उल्लंघन होत असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
दिल्लीतल अखंड भारत मोर्चा या स्वयंसेवी संस्थेने ही तक्रारदाखल याचिका केली आहे. पूर्व दिल्लीतील शाळा आणि रुग्णालये असलेल्या परिसरात या 7 मिशिदी असून त्यांवर लावलेल्या लाऊडस्पीकरमुळे ध्वनीप्रदूषणाचे उल्लंघन होत आहे. कारण, या भोंग्यांचा आवाज ठरवून दिलेल्या मर्यादीत डेसिबलपेक्षा अधिक असल्याचेही याचिकेत म्हटले आहे. एनजीटीने हा मुद्दा गांभीर्याने घेत तपासणी करण्याचा तसेच नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. तसेच एनजीटीचे अध्यक्ष जस्टीस आदर्श कुमार गोयल यांच्या खंडपीठानेही दिल्ली प्रदुषण मंडळावर नाराजी दर्शवली आहे. तसेच तक्रार देऊनही अद्याप कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे.