शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

'2012 मध्ये गळा फाडून ओडरणारे देशभक्त आता पांघरुन घेऊन झोपलेत का?'

By महेश गलांडे | Published: February 17, 2021 7:14 PM

काँग्रेसच्या काळात झालेल्या पेट्रोल डिझेल दरवाढीवर (Fuel Pirce hike) टीका करणारे बॉलिवूड कलाकार आता इलेक्ट्रीक कार चालवतात का?, असा उपरोधिक टोला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी यापूर्वी लगावला होता.

ठळक मुद्देसन 2012 च्या पूर्वीचे देशभक्त 50 ते 55 रुपये लिटर पेट्रोलच्या आणि 30 ते 35 रुपय लिटर डिझेलच्या किंमतीवर गळा फाडून ओरडत होते., तेंव्हा यांच्या काळजाला आग लागली होती. आता, शेतकरी, सर्वसामान्य आमि गरीब माणूस महागाईनं मरायला लागलाय

मुंबई - देशात काँग्रेस आघाडीचं सरकार असताना पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवरुन सेलिब्रिटींनी आवाज उठवला होता. पेट्रोलमुळे महागाई वाढल्याचं ट्विट या सेलिब्रिटींनी केलं होत. त्यामध्ये, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांचा समावेश होता. आता, देशात पेट्रोलने शंभरी गाठली आहे, तरीही हे सेलिब्रिटी काहीही बोलताना दिसत नाहीत. त्यामुळे, या अभिनेत्यांचे जुने ट्विट व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावरुन या सेलिब्रिटींना नेटीझन्स प्रश्न विचारत आहेत. बिहारमधील लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलानेही अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन या सेलिब्रिटींच्या गप्प बसण्यावर टीका केलीय.     

काँग्रेसच्या काळात झालेल्या पेट्रोल डिझेल दरवाढीवर (Fuel Pirce hike) टीका करणारे बॉलिवूड कलाकार आता इलेक्ट्रीक कार चालवतात का?, असा उपरोधिक टोला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी यापूर्वी लगावला होता. आता, राजदनेही ट्विट करुन महानायकासह इतरांनाही आता गप्प का, पांघरुन घेऊन झोपलात का? असा सवाल विचारला आहे. 

सन 2012 च्या पूर्वीचे देशभक्त 50 ते 55 रुपये लिटर पेट्रोलच्या आणि 30 ते 35 रुपय लिटर डिझेलच्या किंमतीवर गळा फाडून ओरडत होते., तेंव्हा यांच्या काळजाला आग लागली होती. आता, शेतकरी, सर्वसामान्य आमि गरीब माणूस महागाईनं मरायला लागलाय. पण, हे निर्लज्जपणाची चादर पांघरुन झोपलेत, असे ट्विट बिहारमधील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाने केले आहे. या ट्विटसोबत राजदने बिग बी अमिताभ बच्चन, अक्षयकुमार, अनुपम खेर आणि चेतन भगत या सेलिब्रिटींचे जुने ट्विट शेअर केले आहेत. सन 2012 साली या सेलिब्रिटींनी ट्विट करुन पेट्रोल दरवाढीच्या प्रश्नावर आवाज उठवला होता. मात्र, सध्या पेट्रोल 100 रुपयांपर्यंत पोहोचले असतानाही हे सर्व गप्प आहेत. त्यामुळे, या सेलिब्रिटींविरुद्ध सर्वसामान्य नागरिकही प्रश्न विचारत आहेत.

भाई जगताप यांनीही केलं होतं लक्ष्य

देशात आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीची शंभरीकडे वाटचाल सुरू असताना हे कलाकार शांत का?  असा सवाल भाई जगताप यांनी उपस्थित केला होता. भाई जगताप यांनी बॉलिवूडचे अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि अनुपम खैर यांनी २०१२ साली केलेल्या ट्विटची आठवण करुन दिली आहे. केंद्रात डॉ. मनमोहन सिंग यांचं सरकार असताना पेट्रोल-डिझेल दरवाढ झाल्यावर अमिताभ बच्चन यांनी रामायणाचा दाखल देत गाड्या कॅशमध्ये करता येतील पण पेट्रोलसाठी कर्ज काढावं लागेल असं म्हटलं होतं. तर अक्षय कुमारने आता सायकल चालवण्याची वेळ आली आहे असं म्हटलं होतं. यासोबतच अनुपम खैर यांनी एक विनोद ट्विट करत पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरुन काँग्रेस सरकारची खिल्ली उडवली होती. 

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलAmitabh Bachchanअमिताभ बच्चनAkshay Kumarअक्षय कुमारRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल