शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

तुमची ऑनलाइन फसवणूक झालीय?, मग वाचा RBIचे नवीन गाइडलाइन्स

By admin | Published: July 07, 2017 12:37 PM

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नवीन मार्गदर्शक तत्त्व जारी करुन सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नवीन मार्गदर्शक तत्त्व जारी करुन सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. एखाद्या ग्राहकाच्या बँक खात्यांमध्ये ऑनलाइन फसणवूक झाल्यास त्याद्वारे होणा-या नुकसानाची जबाबदारी आता ग्राहक नाही तर बँक स्वीकारणार आहेत. यासाठी ऑनलाइन फसवणूक झाल्याच्या तीन दिवसांच्या आत ग्राहकाला तक्रार नोंदवणं आवश्यक आहे. 
 
ज्या दिवशी तुम्ही तक्रार नोंदवला, त्यानंतर 10 दिवसांच्या आत तुमच्या खात्यातून फसवणुकीद्वारे गेलेली रक्कम क्रेडिट करण्यात येईल. मात्र ग्राहकाकडून फसवणुकीची माहिती देण्यास 3 दिवसांहून अधिक कालावधी लागल्यास ग्राहकालाच 25,000 रुपयांपर्यतचे नुकसान सहन करावे लागेल. इंटरनेट बँकींग करणा-या ग्राहकाचं खाते आणि कार्डमधून अनधिकृतरित्या होणा-या व्यवहारांची प्रकरणं मोठ्या प्रमाणात समोर आली आहेत. ग्राहकांच्या तक्रारी लक्षात घेऊन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ही मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहे. 
 
TERMS AND CONDITIONS APPLY 
 
मात्र, जर एखाद्या खातेदारानं स्वतःहून आपला पासवर्ड भलत्याच व्यक्तीसोबत शेअर केला आणि त्यानंतर फसवणूक झाल्याची बाब समोर आल्यास, या घटनेस संबंधित ग्राहक स्वतःच जबाबदार असतील,असेही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं स्पष्ट केले आहे.  ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांपासून वाचण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं प्रत्येक व्यवहारासंदर्भात संदेश आणि ई-मेल अलर्ट जारी केले आहेत.  अलर्टसोबत रिप्लायचा ऑप्शनही देण्यात आला आहे.
 
आणखी बातम्या वाचा
 
 
ऑनलाइन फसवणुकीपासून सतर्क करण्यासाठी मुंबई पोलिसांचा फिल्मी अंदाज
सध्याचं जग हे डिजीटल झालं आहे. बरेच व्यवहार आपण ऑनलाइन करतो आहे. ऑनलाइन सेवेमुळे व्यवहार पटकन होतो तसंच आपला वेळसुद्धा वाचतो. पण या ऑनलाइन व्यवहारांचे जसे फायदे आहेत तसेच तोटेसुद्धा आहेत. अनेक फेक साइट्स आज सक्रीय झाल्या आहेत. ज्याचा सर्वसामान्य लोकांना सामना करावा लागतो आहे. या साइट्सद्वारे लोकांची फसवणूकही बऱ्याचदा होते. ऑनलाइन साइट्सची विश्वासार्हता तपासून मगच व्यवहार करा याबद्दलची बरीच जनजागृती केली जाते आहे. 
ऑनलाइन फसवणुकीपासून लोकांना सावध करण्यासाठी मुंबई पोलिसांनीही पुढाकार घेतला आहे. मुंबई पोलिसांनी ट्विटरवरून पुन्हा एकदा अनोख्या पद्धतीने नागरिकांना आवाहन केलं आहे. पोलिसांनी "अग्निपथ" सिनेमातील अमिताभ बच्चन यांच्या प्रसिद्ध डायलॉगसह त्यांचा फोटो शेअर केला आहे
 
ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या प्रकारांमुळे पोलीस सतत नागरिकांना सतर्क करत असतात. तरीही अनेक जण त्याला बळी पडतात. हे प्रकार रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी "अग्निपथ"मधील अमिताभचा "पूरा नाम, विजय दीनानाथ चौहान... !" हा डायलॉग फोटोवर लिहीत शेअर केला आणि त्याबरोबर सतर्कतेचा इशाराही दिला आहे. 
 
मुंबई पोलिसांनी हा प्रयोग पहिल्यांदाच केलेला नाही. यापूर्वीही त्यांनी मनोरंजनाच्या माध्यमातून सतर्कतेचे संदेश दिले आहेत. यावेळी पासवर्ड, ओटीपी, एटीएम पिन नंबर अशी माहिती शेअर करू नये, असं आवाहन करण्यासाठी "अग्निपथ"मधील डायलॉगचा उपयोग करण्यात आला आहे. ऑनलाइनवर "हिरोगिरी" करू नका, असं आवाहन पोलिसांनी ट्विटमधून सर्वांना केलं आहे. याआधी स्वच्छतेचं आवाहन करण्यासाठी वाराणसीत अमिताभ बच्चन यांच्या "दीवार" सिनेमाचे पोस्टर्स लावण्यात आले होते.