शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सगळं सोडून हिमालयात जाताय का? पवन कल्याणचा लूक पाहून पंतप्रधान मोदींचा प्रश्न...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 17:34 IST

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या शपथविधीसाठी देशभरातील एनडीएशासित राज्यांच्या नेत्यांनी हजेरी लावील.

Pm Naredra Modi Pawan Kalyan : दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचा शपथविधी गुरुवारी(दि.20) दिल्लीच्या रामलीला मैदानात पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यासाठी एनडीएशासित अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह इतर नेते आले होते. यावेळी पीएम मोदींनी सर्व नेत्यांशी आपुलकीने चर्चा केली. पण, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यासोबत झालेल्या संवादामुळे एकच हशा पिकला.

शपथविधी सोहळा आटोपल्यानंतर मीडियाशी संवाद साधताना पवन कल्याण यांनी पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या संवादाची माहिती दिली. मीडियाने पवन कल्याणला विचारले की, पंतप्रधान मोदींसोबत काय चर्चा झाली, त्यावर ते म्हणाले, "पंतप्रधान नेहमी माझ्याशी विनोदशैलीत बोलतात. आजही त्यांनी माझा पोशाख पाहून विचारले की, मी सर्व काही सोडून हिमालयात जात आहे का?" यावर पवन कल्याण यांनी उत्तर दिले, "अजून बरेच काम बाकी आहे. हिमालय थांबू शकतो."

पवन कल्याण यांच्या पोशाखाची चर्चापवन कल्याण खूप धार्मिक आणि कट्टर हिंदुत्ववादी आहेत. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री झाल्यापासून ते बऱ्याचदा भगव्या रंगाचे साधे सुती कपडे घातलेले पाहायला मिळतात. अलीकडेच त्यांनी दक्षिण भारतातील विविध मंदिरांना भेटी दिल्या आणि महाकुंभालाही जाऊन संगमात पवित्र स्नान केले.

दिल्लीला मिळाला नवा मुख्यमंत्री 

रेखा गुप्ता दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री बनल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत रामलीला मैदानावर नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी त्यांना शपथ दिली. रेखा गुप्ता यांच्यासोबत प्रवेश वर्मा, आशिष सूद, पंकज सिंग, मनजिंदर सिंग सिरसा, कपिल मिश्रा आणि रवींद्र इंद्रराज यांनीही शपथ घेतली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीpawan kalyanपवन कल्याणdelhi electionदिल्ली निवडणूकBJPभाजपा