वॉशिंग्टन/नवी दिल्ली : लहान मुले आणि किशोरवयीन मुलांवर लैंगिक अत्याचाराचे (सेक्सटॉर्शन) गुन्हे जगभरात वेगाने वाढत आहेत. डिजिटल होत असलेल्या जगात २०२४ हे वर्ष किशोरवयीन मुलांसाठी सर्वात मोठे आव्हान ठरले आहे.
भारतालाही इशाराअहवालानुसार, ‘फायनान्शिअल सेक्सटॉर्शन’चा सायबर गुन्हा अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये सर्वात वेगाने वाढणारा गुन्हा ठरला आहे. अहवालानुसार, बहुतेक गुन्हे आफ्रिकेतून घडविले जात आहेत. जागतिक सायबर सुरक्षा फर्म कॅस्परस्कीने भारताबाबत असाच इशारा दिला आहे.आशिया-पॅसिफिक प्रदेशात वेगाने वाढणारे डिजिटलायझेशन आणि भू-राजकीय तणावाच्या युगात सायबर गुन्हे वेगाने वाढण्याची शक्यता असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने विशेषतः सेक्सटॉर्शन, फेक डिजिटल कर्ज, डेटा चोरीचा उल्लेख केला आहे.
५,१९० सेक्सटॉर्शन कॉल २०२२ मध्ये रेकॉर्ड करण्यात आले. ९,५९३ कॉल २०२३ मध्ये सेक्सटॉर्शनचे आले.
नेमके काय करतात? nअमेरिकेची तपास संस्था एफबीआयच्या मते, सेक्सटॉर्शन हा एक गुन्हा आहे ज्यामध्ये प्रौढ गुन्हेगार मुले आणि किशोरांना अश्लील चित्रे ऑनलाइन पाठवण्यास भाग पाडतात. nत्यानंतर गुन्हेगार पीडितेचे मित्र आणि कुटुंबीयांसह हे फोटो ऑनलाइन अपलोड करण्याची धमकी देतात.nत्या बदल्यात ते क्रिप्टोकरन्सी ट्रान्सफर अशा विविध प्रकारच्या पेमेंटची मागणी करतात.
स्कॅमसाठी हजारो लोकांची भरतीसंयुक्त राष्ट्राच्या एका अहवालानुसार, रोमान्स-गुंतवणूक स्कॅम, क्रिप्टो फसवणूक, मनी लाॅण्ड्रिंग आणि बेकायदेशीर जुगार यांसारख्या ऑनलाइन-घोटाळ्यांमध्ये काम करण्यासाठी दक्षिण आशियातील हजारो लोकांची भरती करण्यात आली आहे. या प्रकारची कामे करण्यासाठी प्रोग्रामर, मार्केटिंग इत्यादी नोकऱ्यांसाठी भरतीच्या जाहिराती दिल्या जातात.