नवी दिल्ली: कित्येक वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली अयोध्या प्रकरणाची सुनावणी अखेर पूर्ण झाली. या प्रकरणी न्यायालयानं निकाल राखून ठेवला आहे. गेल्या ४० दिवसांपासून अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद सुरू होता. अखेर आज या प्रकरणातील शेवटचा युक्तिवाद पूर्ण झाला. त्यामुळे लवकरच या प्रकरणात न्यायालय निकाल देऊ शकतं. अयोध्येतील ऐतिहासिक जमीन वाद प्रकरणात सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील ५ सदस्यीय खंडपीठानं सुनावणी घेतली. रंजन गोगोई १८ नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्याआधी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येऊ शकतो. आज सुनावणीच्या अखेरच्या दिवशी हिंदू आणि मुस्लिम पक्षकारांमध्ये युक्तिवादादरम्यान शाब्दिक चकमक झाली. यावेळी मुस्लिम पक्षकारांच्या वकिलानं हिंदू पक्षाच्या वतीनं जमा करण्यात आलेला नकाशा फाडला.
अयोध्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण; न्यायालयानं निकाल राखून ठेवला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 4:09 PM