ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 28 - मा बच्चे रातभर रोते है, आसू पिकर सोते है, हा मोदींचा डायलॉग होता, मग महागाईचं काय झालं? डाळी,भाज्या सर्व काही महागलं, महागाई कमी करण्याचं आश्वासन कुठे गेलं? असा प्रश्न काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधीनी लोकसभेत महागाईवर चर्चा करताना केला. पुढे बोलताना ते म्हणाले, मोदी सरकारने उद्योजकांना मदत केली, मात्र शेतकरी, कामगारांना 1 रुपयाचीही मदत केली नाही. आम्ही शेतकऱ्यांची 70 हजार कोटी रुपयाची कर्जमाफी केली,तुम्ही उद्योजकांचं कर्ज माफ केलं.
जो डाळ पिकवतो त्याला 50 रुपये, आणि तीच डाळ बाजारात 180 रु.ला विकली जाते मोदींच महागाई कमी करण्याच अश्वासन फेल ठरलं आहे. महागाईवरुन मोदींनी फक्त डायलॉगबाजी केली असेही ते म्हणाले. महागाईवरील भाषण संपताना राहूल गांधीनी मोदींच्या काळात डाळींच्या किंमती कशा प्रकारे वाढल्या, यावर त्यांनी अरहर मोदी अरहर मोदी असा उपरोधक टोला लगावला आणि आपल्या भाषणाचा शेवट केला.