शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

'मदरशांमध्ये मुलांना कट्टर बनवतात, शिरच्छेद करायला शिकवतात', आरिफ मोहम्मद खान यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 4:05 PM

Udaipur Murder: काल झालेल्या कन्हैया लालच्या हत्येमुळे देशात कट्टरतावाद्यांविरोधात संतापाचे वातावरण आहे. यावरुन केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी मदरशांच्या शिक्षणावर मोठे विधान केले आहे.

Udaipur Murder: मोहम्मद पैगंबर यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यामुळे उदयपूरमध्ये कन्हैया लाल नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येमुळे संपूर्ण देश हादरला आहे. अनेकजण या प्रकरणावर व्यक्त होत आहेत. यातच केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान (Arif Mohammad Khan) यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. मदरसे हे द्वेषाचे मूळ असल्याचे आरिफ मोहम्मद यांचे म्हणणे आहे. 

'मुलांना कट्टर बनवले जात आहे'आरिफ मोहम्मद म्हणाले, 'आमच्या मुलांना निंदा करणाऱ्यांचा शिरच्छेद करायला शिकवले जात आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुस्लीम कायदा कुराणातून आलेला नाही, तो काही व्यक्तींनी लिहिला आहे. त्यात त्यांनी शिरच्छेदाचा कायदा लिहिला आणि हाच कायदा मदरशात मुलांना शिकवला जातोय.' 

अनेकदा ते कट्टरतेवर टीका करतातआरिफ मोहम्मद खान अनेकदा कट्टरतेवर टीका करताना दिसतात. ते म्हणतात की, मौलाना आणि मदरसे मुस्लिमांच्या एका वर्गाला कट्टरपंथी बनवत आहेत. ते गैर-मुस्लिमांबद्दल द्वेष पसरवतात, यामुळेच बालपणात मुलांमध्ये इतर धर्मांबद्दल द्वेष निर्माण होतो. यामुळे ही मुले मोठी झाल्यानंतर इतर धर्माच्या लोकांबद्दल सावध राहतात आणि नेहमी संशयाने भरलेले असतात. आरिफ मोहम्मद यांच्या या विचारांवर अनेकदा टीकाही होते.

कन्हैया लालवर 26 वारकाल राजस्थानच्या उदयपूरमध्ये कन्हैया लाल नावाच्या व्यक्तीची त्याच्या दुकानात घुसून हत्या करण्यात आली. दोन मुस्लिम तरुण त्याच्या दुकानात कपडे शिवण्याच्या बहाण्याने आले आणि कन्हैयावर चाकूने वार केला. या रानटी हल्ल्यात कन्हैया लालचा जागीच मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात मारेकर्‍याने कन्हैया लालवर 26 वार केल्याचे समोर आले आहे. रियाझ अन्सारी आणि मोहम्मद घौस अशी आरोपींची नावे असून, त्यांना उदयपूरपासून 60 किमी अंतरावर असलेल्या राजसमंद येथून अटक करण्यात आली.

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस