शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

‘अर्जुना’चा बाण कोणाकडे? एकनाथ शिंदेंसोबत की शिवसेनेमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 6:21 AM

एकनाथ शिंदेंसोबत की शिवसेनेमध्येच? खोतकरांचे तळ्यात-मळ्यात

लोकमत न्यूज नेटवर्क     जालना : शिवसेनेचे माजी मंत्री आणि उपनेते अर्जुन खोतकर यांच्याबद्दल दररोज वेगवेगळी वक्तव्ये येत आहेत. त्यातच ते सोमवारी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्याची चर्चा असून, त्यांच्यासोबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हेही होते. त्यामुळे खोतकरांनी शिंदेंसोबत हातमिळवणी केली का याची दिवसभर चर्चा होती; परंतु खोतकरांकडून ठोस प्रतिक्रिया मिळू न शकल्याने याबद्दल खोतकरांचे तळ्यात-मळ्यात सुरू असल्याचे चित्र आहे. 

गेल्याच आठवड्यात खोतकर हे दिल्लीत होते, त्यावेळी महाराष्ट्र सदनमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही होते. त्यावेळी समोरासमोर भेट झाल्यावर आपण मुख्यमंत्री शिंदेंना नमस्कार केला. ही महाराष्ट्राची संस्कृती असल्याचे खोतकरांनी सांगून आपण शिवसेनेतच असल्याचे स्पष्ट केले. परंतु रविवारी सायंकाळच्या विमानाने खोतकरांनी दिल्ली गाठली. सोमवारी सकाळी रावसाहेब दानवे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे, स्वत: दानवे आणि खोतकर यांच्यात अर्धा तास गुफ्तगू झाली. नंतर शिंदेंचा सत्कार करताना खोतकर व अन्य खासदारांनी छायाचित्रही काढले. 

दानवे -खोतकर यांच्यात समेट केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री शिंदेंसोबत अर्जुन खोतकर आणि आमच्यात चर्चा झाल्याचे मान्य करून राजकीय वाद मिटवून सोबत राहण्याचे सांगितले. ते आपण मान्य केल्याचे दानवे यांनी सांगितले. खोतकरांच्या शिंदे गटाच्या प्रवेशावर दानवेंनी प्रतिक्रिया दिली नाही.

...तोपर्यंत केवळ चर्चाच याबाबत खोतकरांशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु तो होऊ शकला नाही. याबाबत जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी खोतकरांच्या एकनाथ शिंदे गटात जाण्याच्या वृत्ताचा इन्कार करून जोपर्यंत अर्जुन खोतकर हे स्वत: त्यांची भूमिका स्पष्ट करत नाहीत, तोपर्यंत या केवळ चर्चाच समजा, असे सांगितले.  

टॅग्स :Arjun Khotkarअर्जुन खोतकरShiv Senaशिवसेनाraosaheb danveरावसाहेब दानवे