आत्महत्येसाठी सौरभने वापरले कमांडो चार्लीचे पिस्तूल - जोड
By admin | Published: February 21, 2015 12:49 AM
:::::चौकट::::
:::::चौकट::::मोठा अनर्थ टळला या घटनेच्या वेळी व्यसनमुक्ती केंद्रात कर्मचारी उपस्थित होते. सौरभने जेव्हा गोळी झाडली, तेव्हा एक गोळी त्याच्या डोक्याला स्पर्श करून बाहेर पडली. सुदैवाने ती इतरांना लागली नाही. ही घटना केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. मुलाच्या मृत्यूला त्याचे कुटुंब चार्ली हेमंत गोतमारेला दोषी ठरवत आहे. हेमंतने बंदूक दिल्यामुळेच त्याने हे पाऊल उचलल्याचे सांगितले. सौरभने निराशेतून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. ::::चौकट:::चार्ली हेमंतची कसून चौकशीगिट्टीखदान व एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी हेमंतची कसून चौकशी केली. सुरुवातीला हेमंतने सौरभने घरून बंदूक घेऊन गेल्याचे सांगितले. पोलिसांना घटनास्थळावरून बंदूक, एक गोळी व वापर झालेल्या गोळीचे कव्हर सापडले आहे. या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांना सोपविली आहे. :::::चौकट:::::वडिलांना दाखविण्यासाठी मागितली बंदूक सौरभने हेमंतला बंदूक घ्यायची असल्याचे सांगितले. त्यासाठी तुझी बंदूक वडिलांना दाखवायची आहे. असे सांगून त्याने हेमंतकडून बंदूक घेतली. हेमंतनेही कर्तव्यावर असतानाही बेजबाबदारपणे त्याला बंदूक दिली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला असल्यामुळे, तिचा दुरुपयोग झाला नाही.