Arminder Singh : कॅप्टन अरमिंदर सिंगांची मोठी घोषणा, भाजपात जाणार नाही ; पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 11:12 PM2021-10-19T23:12:17+5:302021-10-19T23:17:43+5:30
जोपर्यंत मी माझं राज्य आणि माझ्या लोकांचं भविष्य सुरक्षीत करत नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही, असे कॅप्टन सिंग यांनी म्हटलं आहे. ठकुराल यांनी ट्विटमध्ये सिंग यांच्या हवाल्याने हे वृत्त दिलंय.
चंडीगढ - माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग दिल्ली दौऱ्यानंतर पंजाबमध्ये परतले आहेत. काँग्रेस पक्ष सोडणार असून भारतीय जनता पक्षात जाणार नसल्याचं त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केलं होतं. त्यानंतर, आता कॅप्टन अरमिंदर सिंग यांनी मोठी घोषणा केली आहे. आपण स्वतंत्र राजकीय पक्ष काढणार असल्याचं सिंग यांनी म्हटलं आहे. कॅप्टन सिंग यांचे माध्यम सल्लागार रवीन ठकुराल यांनी ट्विट करुन नवीन राजकीय पक्षाच्या स्थापनेसंदर्भात माहिती दिली आहे.
जोपर्यंत मी माझं राज्य आणि माझ्या लोकांचं भविष्य सुरक्षीत करत नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही, असे कॅप्टन सिंग यांनी म्हटलं आहे. ठकुराल यांनी ट्विटमध्ये सिंग यांच्या हवाल्याने हे वृत्त दिलंय. नवज्योत सिंग सिद्ध पंजाबसाठी योग्य व्यक्ती नाही. त्यामुळे त्यांनी कुठूनही निवडणूक लढवली, तरीही मी त्यांना जिंकू देणार नाही, असा निर्धार कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी व्यक्त केला होता. मी काँग्रेस सोडतोय आणि मी आता या पक्षात नाही. पण मी भाजपमध्ये प्रवेश करत नाहीए, याचा पुनरुच्चारही सिंग यांनी यापूर्वी केला होता. त्यानुसार, आता त्यांनी नवीन राजकीय पक्षाची घोषणा केली आहे.
पंजाबमधील शेतकऱ्यांना सोबत घेऊन लवकरच एका राजकीय पक्षाची घोषणा करणार असल्याचे कॅप्टन सिंग यांनी सांगितले. तसेच, भाजपसोबत आघाडी करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे. जर शेतकऱ्यांचा विरोध शेतकऱ्यांच्या हितासंदर्भात निर्णयात येईल, तर पुढील 2022 ची विधानसभा निवडणूक भाजपसोबत आघाडीची आशा आहे, असेही सिंग यांनी म्हटले आहे.
डोवाल यांचीही घेतली होती भेट
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत सुरक्षेबद्दल काही विषयांवर चर्चा झाली. त्यात संवेदनशील मुद्द्यांचा समावेश असल्यानं त्यावर भाष्य करू शकत नाही, असं सिंग यांनी सांगितलं. सिद्धू पंजाबसाठी योग्य व्यक्ती नाही. त्यांनी राज्यातल्या कोणत्याही विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, तरीही मी त्यांना जिंकू देणार नाही, असं सिंग म्हणाले. मी मुख्यमंत्री होतो, त्यावेळीही पंजाब काँग्रेसला प्रदेशाध्यक्ष होते. मात्र सिद्धूंनी जे केलं, ते आधी कोणीही केलेलं नाही, असं सिंग यांनी म्हटलं.