शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

मध्य प्रदेशातून आणले शस्त्र

By admin | Published: November 21, 2014 2:30 AM

टीम हॅप्पी न्यू ईयर आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या हत्येसाठी गँगस्टर रवी पुजारी टोळीने मध्य प्रदेशातून मोठा शस्त्रसाठा मुंबईत आणल्याचे स्पष्ट झाले आहे

मुंबई : टीम हॅप्पी न्यू ईयर आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या हत्येसाठी गँगस्टर रवी पुजारी टोळीने मध्य प्रदेशातून मोठा शस्त्रसाठा मुंबईत आणल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी अटक आरोपींच्या चौकशीतून टोळीने तब्बल ६ रिव्हॉल्व्हर आणि किमान ३० काडतुसे गाडीत दडवून मुंबईत आणल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंतच्या तपासात गुन्हे शाखेने पाच रिव्हॉल्व्हर, २१ काडतुसे हस्तगत केली होती. चौकशीत आणखी एक रिव्हॉल्व्हर आणि पाच जिवंत काडतुसे अश्फाक अब्दुल रशीद सय्यद ऊर्फ बचकाना याने मुंब्य्रातील निवासस्थानी दडवून ठेवल्याची माहिती समोर आली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने काल रात्री त्याच्या घरी धाड घालून हा शस्त्रसाठा हस्तगत केला. अनीस-उबेद यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅपपुजारीचा खास हस्तक आणि या गुन्ह्यांसाठी तयार केलेल्या मॉड्यूलचा हॅण्डलर अनीस मर्चंटने अमेरिकेत स्थायिक असलेला सख्खा भाऊ उबेद याच्याशी गुन्ह्यापूर्वी व नंतर व्हॉट्सअ‍ॅपवर अनेकदा संवाद साधला होता. हे संभाषण अनीसच्या मोबाइलमधून हस्तगत केले आहे. त्यात पुजारीकडून या गुन्ह्यांसाठी धाडण्यात येणारी रोकड, गुन्ह्याचे स्वरूप, रूपरेषा याबाबत उल्लेख आढळल्याची माहिती मिळते. दुसरीकडे उबेदनेच अमेरिकेहून पुजारीचे ११ लाख रुपये टप्प्याटप्प्याने अनीसपर्यंत पोहोचवल्याचा दाट संशय गुन्हे शाखेला आहे. या पार्श्वभूमीवर उबेदला या गुन्ह्यात आरोपी केले जाणार आहे. (प्रतिनिधी)