ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि.1 -
लष्करप्रमुख दलबीरसिंग सुहाग जम्मू-काश्मीरमध्ये दाखल झाले आहेत. सीमारेषेवर पाकिस्तानकडून वारंवार होत असलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनामुळे तेथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख जम्मू काश्मीरमध्ये दाखल झाले आहेत. तसेच सर्जिकल स्ट्राईक मोहीम यशस्वी करणा-या अधिकारी आणि जवानांची देखील ते भेट घेणार आहेत. भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर लष्करप्रमुखांचा जम्मू काश्मीरमधील हा पहिला दौरा आहे. आणखी बातम्या
आत्मघाती हल्ल्याचा देशभरात हाय अॅलर्ट
पाकिस्तानच्या कुरापती सुरूच, पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन
भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले होते. या कारवाईनंतर सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापतींमध्ये वाढ झाली आहे. सीमेवर पाकिस्तानी सैन्याच्या हालचाली देखील वाढल्या असून काही भागांमध्ये पाकिस्तानी रेंजर्स दिसल्याचे कळत आहे. त्यामुळे भारतीय सीमारेषेजवळ असणा-या गावांमधली स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.