शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
3
Video : जंगलात फिरताना चुकून अस्वलाच्या घरात गेला अन्...; पहा इन्फ्लूअन्सर काय घडलं?
4
ऑनलाईन गेमच्या नादात JEE क्वालिफाय तरुणावर ९६ लाखांचं कर्ज; आयुष्य झालं उद्ध्वस्त, म्हणाला...
5
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
6
संग्रामसाठी पत्नी मैदानात; अंकिता, पॅडी कांबळेसह ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर, पाहा Video
7
अंबानींच्या ₹1च्या शेअरनं दिला खटा-खट परतावा, कर्ज कमी होताच पाडतोय पैशांचा पाऊस, करतोय मालामाल!
8
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
9
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
10
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 
11
एलन मस्कही चक्रावले! टेस्लाच्या सायबर ट्रकची रशिया-युक्रेन युद्धात एन्ट्री; सात किमीपर्यंत गनचा मारा
12
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
13
'आप'कडून अरविंद केजरीवालांसाठी सरकारी निवासस्थानाची मागणी, निवडणूक आयोगाच्या नियमांचा दिला हवाला 
14
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
15
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
16
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
17
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
19
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
20
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा

‘सर्जिकल’चे ‘व्हिडीओ फुटेज’ जारी करण्यास लष्कराची संमती

By admin | Published: October 06, 2016 5:29 AM

‘सर्जिकल स्ट्राईक’बाबत सुरू असलेली उलटसुलट चर्चा थांबविण्यासाठी गेल्या आठवड्यातील या कारवाईचा व्हिडिओ लष्करातर्फे आज केंद्र सरकारकडे देण्यात आला.

शीलेश शर्मा / नवी दिल्ली ‘सर्जिकल स्ट्राईक’बाबत सुरू असलेली उलटसुलट चर्चा थांबविण्यासाठी गेल्या आठवड्यातील या कारवाईचा व्हिडिओ लष्करातर्फे आज केंद्र सरकारकडे देण्यात आला. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यासंदर्भात सहकाऱ्यांशी सविस्तर चर्चाही केली. सर्जिकल स्ट्राइक्सचे व्हिडिओ फुटेज जारी करण्यास लष्कराची हरकत नसल्याने त्याबाबतचा निर्णय पंतप्रधानांनीच घ्यायचा आहे. मोदी यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्जिकल स्ट्राइक्सनंतच्या परिस्थितीचा आढावा घेतानाच, सीमेवर तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर काय स्थिती आहे आणि देशभर अ‍ॅलर्टमुळे सतर्कता आहे का, याची माहिती करून घेतली. सर्जिकल स्ट्राइक्सबाबत विरोधक शंका उपस्थित करीत असले तरी मंत्र्यांनी त्याबाबत तोंड उघडायचे कारण नाही, असे इशारावजा आवाहन त्यांनी केले. आरोप-प्रत्यारोप यांमुळे देशात ऐक्याचे वातावरण नसल्याचा संदेश बाहेरील राष्ट्रात जात असल्याचे त्यांनी बैटकीत सूचित केले. उरी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने गेल्या आठवड्यात पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून अतिरेक्यांची तळे उद्ध्वस्त केली होती. तथापि, भारताने हल्ला केला नसल्याचा कांगावा पाकिस्तानने केला. भारतातही सर्जिकलबाबत साशंकता व्यक्त करण्यात आली. अरविंद केजरीवाल व काँग्रेसचे मुंबईतील नेते संजय निरुपम यांनीही सर्जिकलचे पुरावे मागितले. मात्र, हे लोक पुरावे मागून पाकिस्तानच्या दुष्प्रचाराची री ओढत असून, त्यामुळे अप्रत्यक्षपणे भारतीय लष्करावर संशय व्यक्त होत आहे, अशी टीका भाजपा नेत्यांनी सुरू केली. हे प्रकरण अधिक चिघळू नये, यासाठीच मोदी यांनी मंत्र्यांना गप्प बसण्यास सांगितले आहे.

नऊ पाकिस्तानी मच्छीमारांना अटक

भुज : सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी भारताच्या हद्दीत आलेली एक बोट अडवून, त्यातील ९ पाकिस्तानी मच्छिमारांना बुधवारी सकाळी ताब्यात घेतले. ही बोट भारताच्या सागरी हद्दीतील चौहान नाल्यापाशी फिरताना आढळताच, सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पाहिली. त्यांनी त्या बोटीसह ९ मच्छिमारांना किनाऱ्यावर आणून, त्यांची चौकशी व तपासणी केली. मात्र त्यांच्याकडे आक्षेपार्ह काही आढळले नाही. ते मच्छिमार चुकून भारताच्या सागरी हद्दीत आले होते. त्यांच्याकडे मासेमारीसाठीचे जाळे आणि अन्य साहित्य होते, असे सांगण्यात आले.

हा लष्कराचा अवमान - नायडू

सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्यांवर हल्ला चढविताना केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी या मोहिमेवर उलटसुलट चर्चा करणे म्हणजे लष्कराने केलेल्या अभिमानास्पद कामगिरीचा अवमान आहे. अशी बेजबाबदार विधाने आणि मागण्यांवर प्रतिक्रिया देण्याचीही गरज नाही. सुदैवाने काँग्रेसने आपल्या नेत्यांच्या विधानांपासून स्वत:ला दूर केले असून, आपनेही या मुद्द्यावरील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सर्जिकल कारवाईबाबत कोणत्याही भारतीयाच्या मनात शंका आहे, असे मला वाटत नाही. आपल्या लष्कराने उर अभिमानाने भरून यावा, अशी कामगिरी केली आहे.

सरकारवर विश्वास ठेवा - रिजीजू

‘सर्जिकल स्ट्राईक’बाबत सरकारवर विश्वास ठेवून हा मुद्दा लष्करावर सोडावा’, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटले आहे. ‘सर्जिकल स्ट्राईक’चे पुुरावे देण्याची मागणी जोर धरू लागल्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना ते बोलत होते.