मुंबई - देशात 15 जानेवारी आर्मी दिन म्हणजेच सैन्य दिवस म्हणून साजरा केला जातो. फील्ड मार्शल के.एम.करियप्पा यांनी याच दिवशी 15 जानेवारी 1949 रोजी शेवटचा ब्रिटिश कमांडर इन चीफ जनरल सर फ्रांसिस बूचर यांच्याकडून भारतीय थल सैन्याच्या कमांडर इन चीफचा पदभार स्वीकारला होता. त्यानिमित्त नवी दिल्ली आणि सैन्याच्या सर्वच प्रमुख कार्यालयात परेड्स आणि सैन्याच्या कसरती केल्या जातात.
भारतीय सैन्यांच्या बलिदानाचे आणि शौर्याचे कौतुक करण्याचा हा दिवस आहे. सैन्याप्रती मनात आदरभाव ठेवत देशभर हा दिवस साजरा केला जातो. सैन्य दिनानिमित्त आपण भारतीय लष्काराच्या काही खास बाबी जाणून घेऊया.
भारतीय सैन्याची स्थापना - कोलकाता येथे 1776 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने सरकारच्या अधीन राहून भारतीय सैन्याची स्थापना केली. भारतीय सैन्याच्या 53 छावण्या आणि 9 सैन्य तळ आहेत. भारतीय सैन्यात सैनिक आपल्या इच्छेने सहभागी होतात.
सर्वात उंच युद्धभूमी भारतातील सियाचीन ग्लेशियल हे जगातील सर्वात उंच रणमैदान आहे. समुद्रसपाटीपासून हे मैदान तब्बल 5 हजार मीटर उंचीवर आहे.
आसाम रायफल आसाम रायफल ही देशातील सर्वात जुनी पॅराममिलिट्री फोर्स आहे. याची स्थापना 1835 साली झाली होती.
सर्वाधिक संख्येनं युद्धी बंदी बनवलेभारत-पाकिस्तान यांच्यातील 1971 सालच्या युद्धावेळी पाकिस्तानी सैन्याच्या जवळपास 93 हजार सैनिक आणि अधिकाऱ्यांनी आत्मसमर्पण केलं होतं. दुसऱ्या महायुद्धानंतर ताब्यात घेतलेल्या युद्ध बंदकांची ही संख्या सर्वाधिक आहे.
जगातील सर्वात उंच पूलबेल पुल हा जगातील सर्वात उंच पूल आहे. हिमाचल प्रदेशमधील द्रास आणि सुरू नदीच्या मध्यभागी लद्दाखच्या पर्वतरांगामध्ये हा पूल आहे. सन 1982 मध्ये भारतीय सैन्याने हा पूल बांधला आहे.
तजाकिस्तानतजाकिस्तान येथे भारतीय वायू सेनेचा एक आऊट स्टेशन तळ आहे. तर दुसरा बेस अफगानिस्तान येथे बनविण्याचा विचार भारतीय वायू सेन करत आहे.
घोडेस्वार रेजिमेंटभारतीय सैन्याकडे एक घोडेस्वार रेजिमेंट आहे. जगभरात अशा प्रकारच्या केवळ तीनच रेजिमेंट शिल्लक राहिल्या आहेत. ज्यामध्ये एक भारतीय आहे.
नौसेना अकॅडमीभारतीय नौसेना अकॅडमी, केरळमधील एझिमाला येथे आहे. आशियातील ही भारतीय प्रकारातील सर्वात मोठी नौसेना अकॅडमी आहे.
गुप्तचर विभागडायरेक्टोरेट ऑफ मिलिट्री इंटेलिजन्स नावाने भारतीय सैन्याची गुप्तचर यंत्रणा काम करते. सन 1941 साली याची स्थापना झाली आहे. सैन्य दलातील भ्रष्टाचार आणि सीमा रेषेवर गुप्त माहिती मिळविण्यासाठी हा विभाग काम करते.