भारतमातेचे रक्षण करताना देशातील पहिला अग्निवीर अक्षय लक्ष्मण गवते या जवानाला वीरमरण आले. मागील वर्षी वादग्रस्त ठरलेल्या अग्नीवीर योजनेद्वारे अनेक तरूण सैन्यात भरती झाले. यातील एका अग्निवीर जवानाला देशाचे रक्षण करताना हौतात्म्य आले. लडाखच्या सियाचीन ग्लेशियरमध्ये तैनात असलेले अग्निवीर (ऑपरेटर) अक्षय लक्ष्मण गवते यांना हौतात्म्य आले. विशेष बाब म्हणजे ऑनड्युटी शहीद झालेले अक्षय पहिले अग्निवीर आहेत. अक्षय शहीद झाल्यानंतर विविध क्षेत्रातील दिग्गजांनी भारतमातेच्या सुपुत्राला सलाम ठोकला. अशातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अक्षय यांच्या कुटुंबीयांसाठी आवाज उठवला. यावर आता भारतीय सैन्याकडून प्रत्युत्तर आले आहे.
इस्रायलने केली विशेष दलाची स्थापना! हमासच्या सैनिकांविरोधात उघडणार मोठी मोहिम
सियाचीनमध्ये शहीद झालेल्या अक्षय लक्ष्मण यांना आर्थिक मदत देण्याची तयारी भारतीय लष्कराने पूर्ण केली आहे. रविवारी रात्रीच अग्निवीरच्या कुटुंबीयांना लाखो रुपयांची मदत मिळणार असल्याची माहिती लष्कराने दिली आहे. काल राहुल गांधी यांनी मदतीवरुन आरोप केले होते.
लष्कराने सांगितले की, नियमांनुसार ४८ लाख रुपयांचा नॉन-कंट्रिब्युटरी इन्शुरन्स, ४४ लाख रुपयांचा एक्स-ग्रेशिया, उर्वरित चार वर्षांच्या कार्यकाळासाठी वेतन म्हणजेच १३ लाख रुपयांपेक्षा जास्त, सशस्त्र सेना अपघात निधीतून ८ लाख रुपयांचे योगदान , ३० हजार रुपयांची तात्काळ भरपाई. कुटुंबाला अग्निवीर किंवा सहाय्य आणि सेवा निधीमध्ये योगदान देखील मिळेल. यामध्ये सरकारी योगदान आणि व्याजाचाही समावेश असेल.
'कमांड अक्षय लक्ष्मण यांना सियाचीनमध्ये सेवा बजावताना प्राण गमवावे लागले. या दु:खाच्या प्रसंगी भारतीय लष्कर शोकाकुल कुटुंबासोबत आहे. आर्थिक सहकार्याबाबत सोशल मीडियावर जारी करण्यात आलेल्या काही संदेशांदरम्यान ही माहिती स्पष्टपणे पोहोचवणे महत्त्वाचे असल्याचे लष्कराने म्हटले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधींनी आरोप केला होता
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अग्निवीर गवते अक्षय लक्ष्मण यांचा फोटो शेअर करत म्हटले की, सियाचीनमध्ये त्यांच्या हौतात्म्याची बातमी अत्यंत दुःखद आहे.'त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या मनापासून संवेदना.'
पुढं राहुल गांधी यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'अग्नवीर, भारताच्या वीरांचा अपमान करण्याचा डाव आहे!'या वक्तव्यावर भाजपने आक्षेप घेतला होता.