जम्मू: जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी घडवलेल्या आयईडीच्या स्फोटात भारतीय लष्कराचे मेजर शशीधरन व्ही. नायर शहीद झाले आहेत. मूळचे केरळचे असलेले नायर पुण्याच्या खडकवासला येथे राहात होते. नौशेरा सेक्टरमध्ये पेट्रोलिंग करत असलेल्या जवानांना लक्ष्य करण्यासाठी दहशतवाद्यांनी इम्प्रोव्हाईज्ड एक्स्प्लोझिव्ह डिव्हाईसच्या मदतीनं स्फोट घडवून आणला. त्यात नायर यांना वीरमरण आलं. नियंत्रण रेषेवर कर्तव्य बजावत असलेल्या भारतीय जवानांना टिपण्यासाठी दहशतवाद्यांनी आईडीच्या सहाय्यानं स्फोट घडवला. त्यात मेजर शशीधरन नायर शहीद झाले. मेजर नायर 2/11 गोरखा रायफलमध्ये कार्यरत होते. या स्फोटात दोन जवान जखमी झाले. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आईडी स्फोटाची कल्पना नियंत्रण रेषेवरील जवानांना तातडीनं देण्यात आली. यानंतर पाकिस्तानच्या बॉर्डर ऍक्शन टीमनं गोळीबार सुरू केला. त्याला भारतीय लष्करानं चोख प्रत्युत्तर दिलं.
दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात पुण्यातील मेजर शहीद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 11:54 AM