प्रशिक्षणार्थी लष्कराच्या अधिकाऱ्यांसह मैत्रिणींना मारहाण; अत्याचार झाला नसल्याची तरुणींची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 11:31 AM2024-09-12T11:31:31+5:302024-09-12T11:46:20+5:30

मध्य प्रदेशात प्रशिक्षणार्थी भारतीय लष्कराच्या जवानांसह दोन महिलांना मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Army officers and their female friends robbed in Indore Madhya Pradesh | प्रशिक्षणार्थी लष्कराच्या अधिकाऱ्यांसह मैत्रिणींना मारहाण; अत्याचार झाला नसल्याची तरुणींची माहिती

प्रशिक्षणार्थी लष्कराच्या अधिकाऱ्यांसह मैत्रिणींना मारहाण; अत्याचार झाला नसल्याची तरुणींची माहिती

Madhya Pradesh Crime : मध्य प्रदेशातून पुन्हा एका अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. आठवड्याभरापूर्वी भररस्त्यात महिलेवर अत्याचार झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एक हादरवणारी घटना घडली. मध्य प्रदेशातील इंदूर शहरापासून काही अंतरावर भारतीय सैन्याच्या दोन प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांसह एका महिलेसोबत लुटीचा प्रकार घडला. मैत्रिणींसोबत नाईट ड्राईव्हवर निघालेल्या दोन प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना मारहाण करून लुटले. हल्लेखोरांनी बंदुकीच्या धाकावर एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची माहिती आधी आली होती. मात्र, नंतर युवतीने अत्याचाराच्या घटना घडली नसल्याचे म्हटलं आहे.

इंदूर शहरापासून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या ऐतिहासिक जाम गेटजवळ हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. मंगळवारी रात्री दोन प्रशिक्षणार्थी लष्करी अधिकारी आणि त्यांच्या दोन महिला मैत्रिणींना लुटल्याची घटना घडली. दरोडेखोरांनी आधी सर्वांना बेदम मारहाण केली आणि नंतर दोघांना ओलीस ठेवत इतरांकडून १० लाख रुपयांची मागणी केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी सहा संशयितांची ओळख पटली असून त्यापैकी दोघांना जंगलातून ताब्यात घेण्यात आले आहे. दोन्ही लष्करी अधिकारी जखमी झाले आहेत. घटनेच्या वेळी एका अधिकाऱ्याने आपल्या वरिष्ठांना बोलविण्यात यश मिळवले पण पोलीस ३० किमी दूर महू येथे पोहोचले तोपर्यंत आरोपी पळून गेले होते. 

सामूहिक बलात्काराची माहिती मिळाल्यानंतर पीडित महिलांनी आपले म्हणणे मांडले आणि त्यांनी बलात्काराच्या घटना घडली नसल्याचे म्हटलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पोलिसांनी सामूहिक बलात्काराची पुष्टी केली होती. मात्र महिलांच्या म्हणण्यानंतर असं काही घडलं नसल्याचे समोर आलं.  याप्रकरणी सध्या दोन आरोपी ताब्यात असून चौघांच्या शोधासाठी १० पथके तयार करण्यात आली आहेत. हल्लेखोरांनी अधिकाऱ्यांचे मोबाईल फोनही लुटले होते. त्यांचे शेवटचे लोकेशन बुरानिया गावात सापडले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बुधवारी पोलिस उपमहानिरीक्षक निमिष अग्रवाल यांनी दोन लष्करी अधिकाऱ्यांसोबत असलेल्या महिला सहकाऱ्यांसोबत सामूहिक बलात्कार झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला होता. मात्र, नंतर अतिरिक्त पोलीस उपायुक्त रुपेश द्विवेदी यांनी सांगितले की, महिलांनी सामूहिक बलात्काराचे आरोप फेटाळले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

पोलिस उपमहानिरीक्षक अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, महूचे दोन सैन्य अधिकारी त्यांच्या दोन मैत्रिणींसह जामगेट येथे कारमध्ये बसले होते. तेव्हा त्यांना सहा सशस्त्र दरोडेखोरांनी घेरले. दरोडेखोरांनी चारही जणांना बेदम मारहाण करून लुटले. यानंतर एक अधिकारी आणि एका महिलेला पकडण्यात आले. तर दुसरा अधिकारी आणि मैत्रिणीला १० लाख रुपये देण्यास सांगितले. मोबाईल नेटवर्क मिळाल्यानंतर एका प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याने आपल्या वरिष्ठांना घटनेची माहिती दिली. मात्र मदत पोहोचेपर्यंत चोरटे घटनास्थळावरून पळून गेले होते.

दरम्यान, पोलिसांकडून गुन्हेगारांचा शोध सुरू आहे. चारही जखमींवर महू येथील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या १५ दिवसात या भागातील ही दुसरी दरोड्याची घटना आहे. याआधीही अशीच दरोड्याची घटना नुकतीच घडली होती ज्यात चोरट्यांनी तरुणांना टार्गेट करून त्यांची गाडी पंक्चर केली होती.

Web Title: Army officers and their female friends robbed in Indore Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.