शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

जेवणाच्या ताटावरुन उठून गेलेला सैन्य दलाचा जवान परतलाच नाही

By admin | Published: March 13, 2016 12:04 AM

फोटो

फोटो
जळगाव: जेवणाचा ताट तयार असताना त्याला पाठ देवून घरातून गेलेला प्रमोद बळीराम चौधरी (वय ३६ रा.म्हाडा कॉलनी, जळगाव मुळ रा.लोहारा ता.पाचोरा) हा सैन्य दलातील जवान नंतर घरी परतलाच नाही. मोबाईलही बंद येत असल्याने परिवाराची चिंता अधिक वाढली आहे. दरम्यान, या प्रकरणी शनिवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनला मिसिंगची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत प्रमोद या जवानाचा भाऊ विनोद चौधरी यांनी दिलेली माहिती अशी की, आठ मार्च रोजी रात्री साडे नउ वाजता म्हाडा कॉलनीतील घरात जेवणाची तयारी झालेली असताना प्रमोद हे अचानक घराबाहेर पडले. यावेळी त्यांना कोणाचा तरी फोन आला असावा,बराच वेळ वाट पाहिल्यानंतर ते न आल्याने पत्नीने त्यांना फोन केला असता मोबाईल बंद येत होता. सर्वत्र शोधाशोध केल्यानंतर शनिवारी एमआयडीसी पोलीस स्टेशला तक्रार नोंदविण्यात आली.
तीन महिन्याच्या सुटीवर आलेे घरी
प्रमोद चौधरी यांची दोन वर्षापासून कारगिल येथे ड्युटी आहे.३१ डिसेंबर रोजी तीन महिन्याच्या सुटीवर घरी आलेले आहेत. चार एप्रिल रोजी ते ड्युटीवर हजर होणार होते, त्यासाठी त्यांचे रेल्वेचे आरक्षणही झालेले आहे.आई वडील व एक भाऊ लोहारा येथे शेती करतात तर दुसरा भाऊ विनोद हा देखील सैन्य दलातच दिल्ली येथे ड्युटीला आहे. प्रमोद यांची पत्नी व मुलगा दोन वर्षापासून जळगावात भाड्याचे घर घेवून शालक सुबोध चौधरी यांच्या शेजारीच राहत होते. त्यांना चार वर्षाचा मुलगा आहे. तीन वर्षाची कार्यकाळ पुर्ण झाल्यानंतर नवीन नियुक्तीच्या ठिकाणी पत्नी व मुलाला ते सोबत घेवून जाणार होते.