पुणे : सध्या चीनकडून अनेक देश आर्थिक मदत घेत आहेत. परंतु, त्या देशांना लवकरच कळेल की, काहीही फुकटात मिळत नसते. त्यासाठी कधी तरी किंमत मोजावीच लागते, असे भारतीय सैन्य दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी येथे सांगितले. तसेच भारताने सायबर धमक्यांना रोखण्यासाठी पुरेसे उपाय योजले आहेत. सायबर धमक्यांना सामोरे जाण्यासाठी आमच्याकडे योग्य यंत्रणा आहे. लष्कराला हळूहळू भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता वाढवित आहे, असेही रावत यांनी सांगितले.‘बिम्सटेक’तर्फे औंध मिलिटरी स्टेशनवर पाच देशांचा संयुक्त युध्दसरावाचा समारोप रविवारी झाला. त्याप्रसंगी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. नेपाळ आणि चीनदरम्यान जवळीकवाढत आहे. त्याबाबत ते म्हणाले, ‘‘आर्थिक प्रगतीची इच्छा असलेल्या कोणत्याही देशाला सहकार्याचे द्विपक्षीय किंवा बहुपक्षीय मार्ग शोधणे आवश्यक असते. चीन आर्थिक सत्ता असल्याने ते इतरांना मदत करीत आहे. परंतु, ज्या देशांनी ही मदत घेतली आहे, त्यांना लवकरच समजेल की, काहीही फुकट मिळत नाही. हे हितसंबंध केवळ तात्पुरते असतात. सामाजिक, आर्थिक संबंध हे बदलत असतात. त्याचे चांगले उदाहरण म्हणजे यूएस-पाकिस्तानचे संबंध. त्यांचे पूर्वीसारखे आता संबंध राहिलेले नाहीत. त्यामुळे चीन आणि इतर देशांमध्ये वाढत असलेल्या जवळकीबाबत भारताला चिंता नाही.’’जनरल रावत म्हणाले, नेपाळ आणि भूतानसारख्या देशांना भौगोलिक परिस्थितीमुळे इतर देशांकडे दुर्लक्ष करावे लागेल. भारत शेजारच्या देशांबरोबर राजकीय संबंध विकसित करण्याच्या दिशेने प्रयत्न करीत आहे. ‘नेबरहूड फर्स्ट अॅँड अॅक्ट ईस्ट’च्या धोरणानुसार भारत काम करीत आहे. त्याचा एक भाग म्हणजे बिम्सटेकचा युद्धसराव आहे.’’चीन उदयोन्मुख आर्थिक प्रतिस्पर्धीचीन भारताचा उदयोन्मुख आर्थिक प्रतिस्पर्धी आहे. दक्षिण पूर्व आशिया विभागात प्रभुत्व स्थापित करण्यासाठी दोन्ही देश एकमेकांशी स्पर्धा करीत आहेत. भारताच्या आर्थिक प्रगतीमुळे दहशतवादाचा धोका कमी होईल, असे रावत म्हणाले.नोकरी मिळाल्यास स्थलांतर थांबेलभारतात बेकायदेशीर स्थलांतराबाबत रावत म्हणाले, स्थलांतर ही एक जागतिक घटना आहे. हे कोणत्याही विशिष्ट देशासाठी मर्यादित नाही. हे प्रत्येक प्रांतांमध्ये होत आहे आणि लोकांना चांगले काम आणि चांगल्या जीवनासाठी स्थलांतरित व्हावे लागते. चांगली नोकरी मिळाली, तर कोणीही स्थलांतरीत होणार नाही.’’
सायबर धमक्यांचा सामना करण्यास लष्कर सज्ज- बिपिन रावत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 1:36 AM