लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : चीन आणि पाकिस्तानकडून असलेले बाह्य धोके आणि देशांतर्गत सुरक्षितता अबाधित राखणे अशा सर्व आघाड्यांवर एकाच वेळी लढण्यास भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज असल्याची ग्वाही लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी दिली आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना जनरल रावत यांनी या सज्जतेस ‘अडीच आघाड्यांची सज्जता’ असे संबोधले. मात्र लष्कराची ही सिद्धता कोणताही ठराविक देश डोळ््यापुढे ठेवून नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.जनरल रावत म्हणाले की, एकाच वेळी अनेक आघाड्यांचा मुकाबला करण्यास भारताची तयारी असली तरी प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडण्याचे (युद्धाखेरीज) इतरही परिणामकारक मार्ग उपलब्ध असतात. याच संदर्भात, गेल्या ४० वर्षांत भारत-चीन सीमेवर एकही गोळी झाडण्याची कधी वेळ आलेली नाही, या पंतप्रधानांच्या विधानाचा त्यांनी संदर्भ दिला.लष्करप्रमुख म्हणाले की, सैन्यदलाच्या गरजांची सरकारला जाणीव आहे. त्यासाठी सरकारचा लष्करास संपूर्ण पाठिंबा आहे. ‘मेक इन इंडिया’चांगली कल्पना आहे. त्याचे दृष्य परिणाम दोन-तीन वर्षांत मिळतील. जगभरातील लष्करी दळे त्यांच्या शस्त्रायुधांचे गुणोत्तर ३०:४०:३० असे ठेवत असते. यात ३० टक्के शस्त्रसामुग्री अत्याधुनिक तर ४० टक्के आधुनिकीकरणाच्या टप्प्यात असते. >डायर म्हटल्याने दुखावलो नाहीबुद्धिजीवी पार्थ चटर्जी यांनी आपली तुलना जालियानवाला बाग हत्याकांड घडवून आणणाऱ्या जनरल डायर यांच्याशी केल्याने आपल्याला बिलकूल वाईट वाटले नाही, असे जनरल रावत म्हणाले. ते म्हणाले की, मी लष्करी अधिकारी आहे व उठसूठ कोणत्याही गोष्टीचा माझ्यावर परिणाम होत नाही. अशा गोष्टींसाठी तयारी ठेवावीच लागते. शेवटी चांगले-वाईट लोक ठरवत असतात. बहुसंख्य लोक जे ठरवतात तेच बरोबर ठरत असते.पर्वतीय युद्धासाठी सैन्यबलपर्वतीय युद्धासाठी ‘१७ स्ट्राइक कॉर्पस््’ नावाचे खास सैन्यबल उभारण्यात येत आहे, असेही लष्करप्रमुखांनी सांगितले. या कामी काहीसा विलंब झाल्याचे मान्य करत ते म्हणाले की, हे खूप गुंतागुंतीचे काम असल्याने वेळ लागणे स्वाभाविकही आहे. या सैन्यदलासाठी सध्या भरती सुरू आहे. भरती झाल्यापासून जवानास युद्धभूमीवर तैनातीसाठी हरतऱ्हेने तयार करण्यासाठी तीन वर्षांचा वेळ लागतोच.
सर्व आघाड्यांवर लढण्यास लष्कर सज्ज
By admin | Published: June 09, 2017 3:49 AM