शहरं
Join us  
Trending Stories
1
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
2
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
3
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
4
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
5
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
6
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
8
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
10
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
11
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
12
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
13
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
17
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?

सैन्यातही अन्यायाची खदखद

By admin | Published: January 14, 2017 1:58 AM

बीएसएफचा आणि सीआरपीएफच्या जवानानंतर आता भारतीय लष्कराच्या जवानानेही व्हिडीओ पोस्ट करून वरिष्ठ अधिकारी

नवी दिल्ली : बीएसएफचा आणि सीआरपीएफच्या जवानानंतर आता भारतीय लष्कराच्या जवानानेही व्हिडीओ पोस्ट करून वरिष्ठ अधिकारी जवानांचा कसा छळ करतात याचा पाढा वाचला आहे. डेहरादून येथे तैनात लान्स नायक यज्ञ प्रताप सिंह या जवानाने व्हिडीओत म्हटले आहे की, लष्कराच्या अनेक छावण्यांत वरिष्ठ अधिकारी जवानांकडून बुट पॉलिश, कपडे धुणे व पाळीव कुत्र्याला फिरविणे यासारखी कामे करून घेतात. सिंह यांनी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना पत्र पाठवून तक्रार केली होती. त्यानंतर लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांचा प्रचंड छळ केला. त्यामुळे सिंह यांनी पंतप्रधान मोदींकडे मदतीची याचना केली आहे. आपल्या या पावलानंतर आता आपले कोर्टमार्शल केले जाते की काय, अशी भीती सतावत असल्याचे सिंह याने व्हिडीओत म्हटले आहे. सिंह यांच्या व्हिडीओवर भारतीय लष्कराची प्रतिक्रियाही आली आहे. जवानाच्या तक्रारीची दखल घेण्यात येत असून अशा तक्रारींच्या निपटाऱ्याची लष्कराकडे स्वतंत्र प्रणाली आहे. या प्रणालीद्वारे सिंह यांच्या तक्रारीचे निराकरण केले जाईल, असे लष्कराने म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)आरोपांत तथ्यगुरुवारी सीआरपीएफच्या जवानाने व्हिडीओ व्हायरल करून आपल्या समस्या मांडल्या होत्या. तत्पूर्वी बीएसएफचा जवान तेज बहादूर यादव याने फेसबूकवर काही व्हिडीओ शेअर करून नियंत्रण रेषेवर तैनात जवानांना निकृष्ट अन्न दिले जात असल्याचा आरोप केला होता.सरकारकडून जवानांसाठी पुरेसे रेशन पाठविले जाते. तथापि, अधिकारी त्याची परस्पर विल्हेवाट लावत असल्यामुळे जवानांना निकृष्ट अन्नावर दिवस कंठावे लागत असल्याचे यादव याने व्हिडीओत म्हटले होते.च्एका इंग्रजी दैनिकाने बीएसएफचे अधिकारी जवानांचे रेशन छावणीजवळील दुकानदारांना कमी दरात विकत असल्याचे समोर आणले होते. गृह मंत्रालयानेही जवानांच्या अन्नाबाबत काही मुद्दे असल्याचे सांगून यादव यांच्या आरोपांत तथ्यांश असल्याची अप्रत्यक्ष कबूली दिली आहे.१६ जानेवारीला सुनावणीजवानांना निकृष्ठ दर्जाचे अन्न देण्यात येत असल्याच्या आरोपाबाबत गृह मंत्रालयाकडून स्थितीदर्शक अहवालाची मागणी करणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालय १६ जानेवारी रोजी सुनावणी करणार आहे. शुक्रवारी सुनावणी न होऊ शकल्यामुळे मुख्य न्यायमूर्ती जी. रोहिणी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सुनावणीसाठी १६ जानेवारी ही तारिख निश्चित केली आहे. बीएसएफचा जवान तेज बहादूर यादव याने फेसबूकवर पोस्ट केलेल्या व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर सेवानिवृत्त केंद्रीय कर्मचारी पुरण चंद आर्य यांनी ही याचिका दाखल केलेली आहे.