बाबा राम रहीमच्या भक्तांना देण्यात येत होतं शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण - सैन्यानं दिला होता इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2017 12:30 PM2017-08-28T12:30:42+5:302017-08-28T12:33:29+5:30

डेरा सच्चा सौदाच्या अनुयायांना सिरसामधल्या मुख्यालयामध्ये शस्त्रास्त्रं चालवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं का हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेकांच्या मनात हा प्रश्न घोळत असून भारतीय सैन्यानं या संदर्भात 2010 मध्येच इशारा दिला होता, अशी माहिती समोर येत आहे. 

army warned about arms training in dera saccha sauda | बाबा राम रहीमच्या भक्तांना देण्यात येत होतं शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण - सैन्यानं दिला होता इशारा

बाबा राम रहीमच्या भक्तांना देण्यात येत होतं शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण - सैन्यानं दिला होता इशारा

Next
ठळक मुद्देडेरामध्ये ज्यावेळी पोलीसांनी धाडी टाकल्या त्यावेळी त्यांना तिथं शस्त्रास्त्रं आढळली नाहीत.मात्र, पंचकुला येथे उसळलेल्या हिंसाचारादरम्यान डेराच्या भक्तांच्या हातात रायफल, पिस्तुलं आदी शस्त्रं आढळली आहेत.

चंदीगढ, दि. 28 - डेरा सच्चा सौदाच्या अनुयायांना सिरसामधल्या मुख्यालयामध्ये शस्त्रास्त्रं चालवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं का हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेकांच्या मनात हा प्रश्न घोळत असून भारतीय सैन्यानं या संदर्भात 2010 मध्येच इशारा दिला होता, अशी माहिती समोर येत आहे. 
एखाद्या माजी सैनिकाची मदत बाबा राम रहीमच्या अनुयायांना शस्त्रास्त्र चालवण्याच्या प्रशिक्षणासाठी घेण्यात आली असावी असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे, असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. असं प्रशिक्षण घेतलेल्या सैनिक अनुयायांनी डेरापासून जरा लांबच रहावं असा सल्लाही देण्यात आला असावा, ज्यामुळे ते कुणाच्या नजरेत येणार नाहीत. कारण, डेरामध्ये ज्यावेळी पोलीसांनी धाडी टाकल्या त्यावेळी त्यांना तिथं शस्त्रास्त्रं आढळली नाहीत. मात्र, पंचकुला येथे उसळलेल्या हिंसाचारादरम्यान डेराच्या भक्तांच्या हातात रायफल, पिस्तुलं आदी शस्त्रं आढळली आहेत.
भक्तांना शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण देण्यात आलं असावं असा एक प्रकार वादग्रस्त बाबा रामपाल याच्या प्रकरणी 2014 मध्ये उघडकीस आला होता. ज्यावेळी हिस्सारमध्ये सतलोक आश्रमात रामपालला अटक करण्यासाठी पोलीस गेले त्यावेळी पोलीसांवर हल्ला करून त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळी एकूण सहा जणांना प्राण गमवावे लागले होते. 
सतलोक आश्रमात शस्त्रास्त्रं चालवण्याचं प्रशिक्षण देण्यात येतं का यावरून हरयाणा उच्च न्यायालयाने पुढाकार घेत स्यू मोटो कारवाई केली आणि 4 डिसेंबर 2014 रोजी हरयाणा सरकारला तशी नोटीस बजावली. 
आताही, न्यायाधीश एम. जयपाल यांनी डेराच्या कार्यकर्त्यांवर कडक नजर ठेवावी आणि हा प्रश्न चिघळणार नाही याची काळजी घ्यावी असं निरीक्षण नोंदवलं आहे. रामपालच्या घटनेची तुलना केली तर त्यापेक्षा आता हिंसाचारातील बळींची संख्या जास्त असेल असंही न्यायाधीशांनी नमूद केलं होतं. अर्थात, 2015मध्ये डेराला क्लीन चीट देताना, हरयाणा सरकारनं चौकशी केली असता डेरामध्ये शस्त्रास्त्रं आढळली नसल्याचं नमूद केलं. हरयाणाचे महाधिवक्ता किंवा अॅडव्होकेट जनरल बलदेव राज महाजन यांनीही डेरामध्ये त्यावेळी आक्षेपार्ह काही आढळलं नसल्याचं म्हटलं आहे.

Web Title: army warned about arms training in dera saccha sauda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.