नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल कथित अपमानास्पद उद्गार काढल्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात देशभरात डझनभर याचिका दाखल झाल्या आहेत. यानंतर अर्णब यांनी दिलासा मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अर्णब यांनी न्यायालयात याचिका दाखल केली असून यावर आज सकाळी साडे दहा वाजता सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि एम. आर. शाह याचिकेवर सुनावणी घेणार आहेत. बुधवारी रात्री ऑन एअर गेलेल्या कार्यक्रमात सोनिया गांधी यांच्याबद्दल कथित अनुद्गार काढल्याप्रकरणी काँग्रेसशासित राज्यांमध्ये डझनभर एफआयएर दाखल झाले आहेत. महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगढ, राजस्थान, झारखंडमधल्या पोलीस ठाण्यांमध्ये अर्णब यांच्याविरोधात काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी एफआयआर नोंदवले आहेत. बुधवारी झालेल्या कार्यक्रमानंतर आपल्यावर हल्ला झाल्याचा आरोप अर्णब यांनी केला. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पालघरमध्ये झालेल्या मॉब लिंचिंगबद्दल सोनिया गांधी गप्प का, असा सवाल अर्णब यांनी उपस्थित केला. त्यावेळी त्यांनी सोनिया यांच्या इटालियन पार्श्वभूमीचा उल्लेख केला. अर्णब यांचं विधान निषेधार्ह असल्याचं पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटलं होतं. सोनिया गांधी भारतात आल्या त्यावेळी त्यांचं वय २२ वर्षे होतं. त्या गेल्या ५२ वर्षांपासून भारतात राहत आहेत. त्यांनी त्यांच्या आयुष्याचा मोठा काळ भारताची सेवा केली आहे, असं सिंग म्हणाले.
आणखी वाचा...
सावधान! आता पीएफ अॅडव्हान्स काढाल तर 10 वर्षांनी पस्तावाल
मुलगा झाला म्हणून अख्ख्या पंचक्रोशीत बत्ताशे, लाडू वाटले; निघाला कोरोना पॉझिटिव्ह
विखारी पाकिस्तान! भारताविरोधात मोठ्या सायबर युद्धाला सुरुवात
कोरोनाचे दुष्परिणाम; तब्बल २५ कोटी बळी जाण्याची भीती