ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - पाकिस्तानातील एका दहशतवादी संघटनेने 'टाईम्स नाऊ' या इंग्रजी वृत्त वाहिनीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. धमकीनंतर अर्णव गोस्वामी यांच्या सुरक्षेत केंद्र सरकारने वाढ केली असून त्यांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे.
उरी हल्ल्यानंतर गोस्वामी यांनी त्यांच्या 'न्यूज अवर' या कार्यक्रमातून पाकिस्तान सरकार आणि तेथील दहशतवादी संघटनांवर हल्लाबोल केला होता. या पार्श्वभुमीवर गोस्वामी यांना धमकी देण्यात आली आहे. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार धमकीनंतर गोस्वामींसाठी २० सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये दोन सुरक्षा अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
अर्णव गोस्वामीच्या सुरक्षेबाबत गुप्तचर यंत्रणेनेही सरकारला सतर्क केलं होतं. या पार्श्वभुमीवर गोस्वामी यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.