नवी दिल्ली : संपूर्ण जग कोरोना व्हायरसशी झुंज देत असताना, पाकिस्तानात मात्र 300 दहशतवादीभारतात घुसण्याच्या तयारीत आहेत. रमजानच्या पवित्र महिन्यातच हे दहशतवादीभारतात रक्ताचा खेळ खेळण्याचा कट आखत आहेत. यासंदर्भात गुप्तचर संस्थेकडून मिळालेल्या माहितीनंतर, भारतीय लष्कराने सीमेवरील जवानांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
अनेक दहशतवादी असू शकतात कोरोनाग्रस्त -भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीओकेमधील दहशतवादी तळांवर असलेल्या अनेक दहशतवाद्यांना कोरोनाची लागण झालेली असू शकते. यासंदर्भातही भारतीय लष्कर सतर्क आहे.
किम जोंगनंतर बहीण नव्हे, 'हे' बनू शकतात उत्तर कोरियाचे हुकूमशहा; संपूर्ण जग म्हणतं 'जल्लाद'!
पाक लष्कराने 16 लॉन्च पॅड केले आहेत अॅक्टीव्ह -पाकिस्तानातून लश्कर-ए-तैय्यबा आणि जैश-ए-मोहम्मदचे जवळपास 300 दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत आहेत. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी सैन्याने आयएसआयच्या मदतीने नौशेरा आणि छम्बच्या काही भागांत एलओसीजवळ 16 दहशतवादी तळ सुरू केले आहेत. हे दहशतवादी उत्तरी काश्मीरच्या गुलमर्ग येथून भारतात घुसण्याच्या तयारीत असल्याची माहिती, लष्कराच्या फील्ड इंटेलिजंन्स युनिटला मिळाली आहे.
दहशतवाद्यांच्या मृतदेहाजवळ जाण्यापूर्वी सतर्कता बाळगण्याचे आदेश -अधिकाऱ्यांकडून निर्देश देण्यात आले आहेत, की सीमेवर दहशतवादी अथवा घुसखोरांशी सामना झाल्यानंतर, त्यांच्या मृतदेहाजवळ जाण्यापूर्वी अत्यंत सतर्कता बाळगा. त्यांच्यातील अधिकांश दहशतवाद्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता आहे.
खूशखबर...कोरोनावरील लसीची चाचणी करण्यात आलेली महिला म्हणाली, 'Doing Fine'!
पाकिस्तानातील एजन्सीज दहशतवाद्यांना करतायेत मदद -पाकिस्तानातील एजन्सीज दहशतवाद्यांना आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषा पार करण्यासाठी मदत करत आहेत. गेल्या काही दिवसांत सीमा रेषेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. गोळीबाराच्या आडून दहशतवादी आणि कोरोना संक्रमितांना भारतात पाठवण्याचा दहशतवाद्यांचा डाव आहे. मात्र, भारतानेही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.