लखनऊ - आंबा म्हटले की, कुणाच्याही तोंडाला पाणी सुटले नाही तर नवल. अगदी हापूस आंब्यापासून ते स्थानिक बाजारपेठेतील आंब्यांना या दिवसांत प्रचंड मागणी असते. पण, एकाच ठिकाणी जर शेकडो जातींचे आंबे मिळत असतील तर? होय, ही संधी चालून आली आहे.लखनऊ येथील इंदिरा गांधी प्रतिष्ठान येथे २३ व २४ जून रोजी राज्य सरकारतर्फे आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांमध्ये आंब्यासह सर्वच फळांबाबत जागरूकता निर्माण करणे हा यामागचा हेतू आहे. या महोत्सवात ७०० प्रकारचे आंबे दाखलहोणार असल्याची माहिती फलोत्पादन आणि अन्न प्रक्रिया विभागाचे संचालक राघवेंद्र प्रताप यांनीदिली.राघवेंद्र प्रताप सिंह म्हणाले, उत्पादनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी नवीन तंत्रज्ञानावर भर देण्यात येत आहे. विविध जातींच्या आंब्यांची माहिती या माध्यमातून मिळणार आहे. त्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. फलोत्पादनाच्या पर्यटनालाही यातून चालना मिळणार आहे.महोत्सवाच्या निमित्ताने नवीन तंत्रज्ञानाबाबत एक चर्चासत्रही आयोजित करण्यात आले आहे. यातून आंबा उत्पादकांच्या समस्या सोडविण्याचाही प्रयत्न आहे. यानिमित्ताने उत्पादक-विक्रेत्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. आंब्याची बाजारपेठ आणि आंब्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांवरही या वेळी चर्चा होईल.
एकाच झाडाला ३00 जातींचे आंबेउत्तर प्रदेश हे सर्वाधिक आंबा उत्पादन करणारे राज्य आहे. राज्यात ४०-४५ लाख मेट्रिक टन आंब्याचे उत्पादन होते. भारतातील १८४ लाख मेट्रिक टन उत्पादनाच्या ते २३ टक्के आहे. उत्तर प्रदेशातील लंगडा, दशेहरी, जौहरी, नीलम, आम्रपाली, गुलाब खास या जाती खास आहेत.मलिमुल्ला या आंबा उत्पादकाने आपल्याकडील आंब्याच्या नव्या जातीला ‘योगी’ हे नाव दिले आहे. कलिमुल्ला असे त्यांचे नाव असून, त्याच्या एका झाडाला ३00 वेगवेगळ्या जातीचे आंबे येतात. त्यांच्या या प्रयोगाबद्दल त्यांना ‘पद्मश्री’ तसेच राज्य सरकारचा ‘उद्यान पंडित’ हे किताब मिळाले आहेत.