नवी दिल्ली : पाकिस्तानच्या आयएसआयसमर्थित गुप्तचर संस्थांना कथितरीत्या गोपनीय दस्तऐवज पुरविण्याच्या आरोपाखाली हवाईदलाच्या एका बडतर्फ अधिकाऱ्यास दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली.एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली. रंजीत असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. केरळात राहणाऱ्या रंजीतला सोमवारी अटक करून दिल्लीत आणण्यात आले. रंजीतने आयएसआयामर्थित संस्थांना ई-मेलच्या माध्यमातून गोपनीय माहिती पुरविल्याचे प्राथमिक तपासाअंती समोर आले आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)
हेरगिरीप्रकरणी हवाईदलाच्या माजी अधिकाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2015 2:37 AM