नवी दिल्ली : कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यामध्ये मुंबई पीओकेवरून जुंपलेल्या वादात आता राष्ट्रीय महिला आयोगाने एन्ट्री केली आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईकांना अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच कंगनाने कुठलेही देशद्रोही वक्तव्य केले नसल्याची बाजू आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी घेतली आहे.
शिवसेना, काँग्रेस, भाजपासह मनसेनेही तिच्या विधानावर आक्षेप घेत तिला इशारा दिला आहे. पण त्यात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट कंगनाला ट्विटरवरुन धमकी दिली आहे. ते म्हणाले की, कंगनाला खासदार संजय राऊत यांनी सौम्य शब्दांत समज दिली. ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलेब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनावर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे असं त्यांनी सांगितले आहे.
'पाब्लो' जगातील सर्वात मोठा ड्रग माफिया! पैसा एवढा की वाळवी खात होती, क्रूरतेचा विचारच नको
यावर महिला आयोगाच्या अध्यक्षा शर्मा यांनी कंगनाची बाजू घेतली आहे. कंगनाच्या कोणत्याही ट्विटवरून असे वाटत नाही की ती देशद्रोही आहे किंवा कोणाला तिने धमकी दिली आहे. यातून शिवसेना नेत्यांची विचारधारा समोर येते. महिला स्वातंत्र्याची गोष्ट करत असतील तर ते त्यास सहन करू शकत नाहीत, असा आरोप त्यांनी केला आहे.
यानंतर त्यांनी व्हॉट्सअॅपवर आलेला स्क्रीनशॉट शेअर करत प्रताप सरनाईकांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. आमदार प्रताप सरनाईक हे कंगनाला मारहाण करण्याचे बोलत आहेत. त्यांच्यावर सु मोटू गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करण्याची मागणी मुंबई पोलिसांकडे केली आहे.
EMI न देऊ शकलेल्यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; 'थकबाकीदाराचा शिक्का नको'
रशियासोबत मोठी डील! लडाखमध्ये लढण्यासाठी खतरनाक AK-47 203 मिळणार
IMP: कार चालविताना मास्क बंधनकारक? केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा मोठा खुलासा
चीनच नाही, पाकिस्तानकडूनही हल्ल्याची शक्यता; बिपीन रावत यांचा गंभीर इशारा