शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

न्यायमूर्तीेंविरुद्ध अटक वॉरंट!

By admin | Published: March 10, 2017 11:38 PM

कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी. एस. कर्णन यांनी अवमान खटल्यात ३१ मार्च रोजी आमच्यासमोर हजर झाले पाहिजेत, असे सांगून सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याविरोधात

नवी दिल्ली : कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी. एस. कर्णन यांनी अवमान खटल्यात ३१ मार्च रोजी आमच्यासमोर हजर झाले पाहिजेत, असे सांगून सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याविरोधात शुक्रवारी जामीनपात्र अटक वॉरंट बजावले. अवमान खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तीविरोधात अटकवॉरंट काढण्याची ही पहिलीच वेळ आहे. सरन्यायाधीश जे. एस. खेहार यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने करनन हे त्यांच्यावर अवमानाची नोटीस बजावूनही गैरहजर राहिल्याबद्दल तीव्र आक्षेप घेतला आणि कर्णन यांनी ३१ मार्च रोजीउपस्थित राहावे, यासाठी त्यांच्यावर हे अटकवॉरंट बजावण्याचा आदेश पश्चिम बंगालच्या पोलिस महासंचालकांना दिला. या याचिकेची नोटीस आधीच बजावली गेलेली आहे. तरीही या न्यायालयात कर्णन यांची व्यक्तिश: उपस्थिती आवश्यक आहे. ते न्यायालयात स्वत: आले नाहीत आणि त्यांनी वकिलामार्फत आपली बाजू मांडली नाही. अशा परिस्थितीत इतर कुठलाही पर्याय उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्यावर जामीनपात्र वॉरंट बजावणे आवश्यक झाले आहे. सरन्यायाधीशांवर अ‍ॅट्रॉसिटी लावाअनुसूचित जात आणि अनुसूचित जमात (अत्याचार प्रतिबंध) कायदा, १९८९ मधील योग्य त्या कलमान्वये सरन्यायाधीश जे. एस. खेहार आणि इतर सहा न्यायमूर्तींवर गुन्हा नोंदविण्याचे आदेशही कर्णन यांनी दिले. कर्णन यांच्या या वर्तनामुळे मी अतिशय दु:खी असल्याचे ख्यातनाम विधिज्ञ सोली सोराबजी यांनी म्हटले आहे. ही दुर्दैवी बाब आहे.असे आरोप न्यायमूर्तीने माध्यमांसमोर करणे खेदजनक आहे. कारवाई करण्याशिवाय सर्वोच्च न्यायालयासमोर दुसरा मार्ग नव्हता आणि कृती बरोबरच आहे. कर्णन त्यांच्यावरील अवमान प्रकरण चिघळवत आहेत, असे सोराबजी म्हणाले.