बलवंत तक्षक -चंदीगड : पंजाबमध्ये भूविकास बँकांचे कर्ज न फेडणाऱ्या जवळपास दोन हजार शेतकऱ्यांच्या अटकेचे आदेश (वॉरंटस्) तयार असून काही शेतकऱ्यांना अटकही झाली आहे. वसुलीसाठीच्या या कारवाईवरून शेतकरी संघटनांत भगवंत मान सरकारविरोधात नाराजी वाढत आहे.
राज्य सरकारला ७१ हजार शेतकऱ्यांकडून ३,२०० कोटी रुपये वसूल करायचे आहेत. फिरोजपूरमधील रामवाड़ा वस्तीतील शेतकरी बक्षीस सिंह यांना पकडण्यात आले होते. त्यांच्याकडे ११ लाखाचे कर्ज थकले आहे. एका महिन्यात त्यांनी कर्जफेड करतो, असे लिहून दिल्यावर त्यांना अटक केली गेली नाही.
कारवाई सहन करणार नाही : संयुक्त समाज मोर्चाचे नेते बलबीर सिंग राजेवाल यांनी मान सरकारला आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा दिला. ते म्हणाले, “बरनाला सरकार असताना सहकारी संस्था शेतकऱ्यांकडून कर्ज वसुलीसाठी वापरले जाणारे ‘कलम ६७ ए’ निलंबित केले गेले होते. परंतु, मान सरकार आता बँकांच्या कर्मचाऱ्यांना या कलमांतर्गत कारवाईची सूट देत आहे. आम्ही हे सहन करणार नाही.