आर्टिकल-10
By admin | Published: January 17, 2015 1:19 AM
समीक्षेच्या बाबतीत शिक्षण क्षेत्राशी संबंधित अनेक स्त्रिया संशोधन करीत आहेत. यात संत साहित्यावर डॉ. सुहासिनी ईलेकर, लोकसाहित्याच्या क्षेत्रात अभास केलेल्या तारा परांजपे, शैला लोहिया, कादंबरीवरील अभ्यासक आणि सातत्याने समीक्षणात्मक लेखन करणार्या उषा हस्तक, डॉ. लता मोहरीर यांचा उल्लेख करणे आवश्यक आहे. प्राचीन मराठी लेखनावर आणि संत साहित्यावरही बरेच लेखन झाले आहे. तौलनिक साहित्यावर लता मोहरीरांनी काम केले आहे. उषा हस्तक, चंद्रज्योती भंडारी, डॉ. मीरा धांडगे, अरुणा लोखंडे, कांचन पाडगावकर, प्रतिमा जोशी, शुभदा धारूरकर, मंगला वैष्णव याही समीक्षेच्या भूमिकेतून साहित्याचा वैचारिक वेध घेत आहेत; पण बरेच काम विद्यापीठीय पातळीवर होते आहे. बालवाङ्मय हा अवघड प्रकार. नैतिक तत्त्वे, सत्य, सांस्कृतिक ठेवा किंवा विज्ञान सोप्या शब्दांत सांगणे ही कला आहे. लीला शिंदे, वंदना अघोर, सवि
समीक्षेच्या बाबतीत शिक्षण क्षेत्राशी संबंधित अनेक स्त्रिया संशोधन करीत आहेत. यात संत साहित्यावर डॉ. सुहासिनी ईलेकर, लोकसाहित्याच्या क्षेत्रात अभास केलेल्या तारा परांजपे, शैला लोहिया, कादंबरीवरील अभ्यासक आणि सातत्याने समीक्षणात्मक लेखन करणार्या उषा हस्तक, डॉ. लता मोहरीर यांचा उल्लेख करणे आवश्यक आहे. प्राचीन मराठी लेखनावर आणि संत साहित्यावरही बरेच लेखन झाले आहे. तौलनिक साहित्यावर लता मोहरीरांनी काम केले आहे. उषा हस्तक, चंद्रज्योती भंडारी, डॉ. मीरा धांडगे, अरुणा लोखंडे, कांचन पाडगावकर, प्रतिमा जोशी, शुभदा धारूरकर, मंगला वैष्णव याही समीक्षेच्या भूमिकेतून साहित्याचा वैचारिक वेध घेत आहेत; पण बरेच काम विद्यापीठीय पातळीवर होते आहे. बालवाङ्मय हा अवघड प्रकार. नैतिक तत्त्वे, सत्य, सांस्कृतिक ठेवा किंवा विज्ञान सोप्या शब्दांत सांगणे ही कला आहे. लीला शिंदे, वंदना अघोर, सविता वैद्य इ. या क्षेत्रात चांगले काम करताहेत.आत्मचरित्रात जनाबाई गिर्हे, इंदू जोंधळे ही नावे ठळकपणे येतात.भाषांतर संस्कृती मराठी साहित्यात फार मोठ्या प्रमाणावर येत आहे. जगभराच्या साहित्याबरोबर प्रांतीय साहित्यही भाषांतरित होत आहे. हरझॉग ही नोबेल प्राईझ विनर अमेरिकनन ज्यू लेखक सॉलबेलो यांची कादंबरी, फ्रेंच लेखक गी.द.