नवी दिल्लीः लोकसभा निवडणूक जस जशी जवळ येत आहे, तस तशी तिची रंगत वाढत चालली आहे. पुन्हा सत्तेत आल्यास जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 आणि कलम 35 ए हटवण्याचं भाजपानं जाहीरनाम्यातून आश्वासन दिलं आहे. भाजपाच्या या घोषणेनंतर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि खासदार फारुख अब्दुल्ला यांनी गंभीर इशारा दिला आहे.जर जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवलं, तर आमच्यासाठी स्वातंत्र्य होणं अधिक सोपं जाईल, असंही अब्दुल्ला म्हणाले आहेत. त्यांना ते कलम हटवायचं आहे, त्यांना वाटतं बाहेरून माणसं आणून इथे त्यांना वास्तव करायला देऊ, आमची संख्या कमी करतील आणि आम्ही झोपा काढत राहू?, त्यांना असं वाटतं. आम्ही त्यांच्याशी दोन हात करू, 370 कलम कसं हटवतात ते पाहतोच?, अल्लाह शपथ सांगतो, जर असं झालं, तर आम्ही भारतापासून स्वातंत्र्य होऊ, असं अब्दुल्ला म्हणाले आहेत.
'...तर अल्लाह शपथ भारतापासून जम्मू-काश्मीर स्वतंत्र होईल'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 17:27 IST