"काश्मीरमध्ये पुन्हा लागू व्हावे कलम ३७०’’ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचे विधान
By बाळकृष्ण परब | Published: October 16, 2020 10:30 PM2020-10-16T22:30:19+5:302020-10-16T22:44:39+5:30
P.Chidambaram statement News : जम्मू काश्मीर आणि लडाखमधील नागरिकांचे अधिकार परत मिळवण्यासाठी मुख्य प्रवाहातील पक्षांनी घटनात्मक लढाई लढण्यासाठी एकत्र येण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे देशातील नागरिकांनी स्वागत केले पाहिजे.
नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० लागू करून ५ ऑगस्ट २०१९ पूर्वीची परिस्थिती बहाल करावी या मागणीसाठी काश्मिरी पक्षांनी आघाडी केली आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्यात यावे, असे विधान केले आहे. तसेच या मागणीसाठी काश्मिरी पक्षांनी केलेल्या आघाडीलाही पाठिंबा दिला आहे.
पी. चिदंबरम यांनी सांगितले की, केंद्र सरकारने कलम ३७० हटवण्याचा निर्णय मागे घेतला पाहिजे. तसेच जम्मू काश्मीर आणि लडाखमधील नागरिकांचे अधिकार परत मिळवण्यासाठी मुख्य प्रवाहातील पक्षांनी घटनात्मक लढाई लढण्यासाठी एकत्र येण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे देशातील नागरिकांनी स्वागत केले पाहिजे.
जम्मू-कश्मीर की मुख्यधारा की क्षेत्रीय पार्टियों का जम्मू, कश्मीर और लद्दाख के लोगों के अधिकारों को बहाल करने के लिए संवैधानिक लड़ाई लड़ने के लिए एक साथ आना एक ऐसा विकास है जिसका भारत के सभी लोगों द्वारा स्वागत किया जाना चाहिए।
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) October 16, 2020
केंद्र सरकारने मुख्य प्रवाहातील पक्ष आणि आणि जम्मू काश्मीरमधील जनतेकडे ते देशविरोधी असल्याच्या नजरेने पाहणे बंद केले पाहिजे. काँग्रेस जम्मू काश्मीरमील जनतेचे अधिकार परत मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे. केंद्र सरकारने ५ ऑगस्ट २०१९ रोजी मनमानी पद्धतीने घेतलेला असंवैधानिक निर्णय मागे घेतला पाहिजे, असे चिदंबरम म्हणाले.
कांग्रेस जम्मू-कश्मीर के लोगों की स्थिति और अधिकारों की बहाली के लिए भी दृढ़ है।
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) October 16, 2020
मोदी सरकार द्वारा 5 अगस्त, 2019 को लिए गए मनमाने और असंवैधानिक फैसलों को रद्द किया जाना चाहिए।
दरम्यान, जम्म-काश्मीरमधील मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षांनी गुरुवारी एका बैठकीचे आयोजन करत जम्मू-काश्मीरला पुन्हा एकदा विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली. तसेच या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी काश्मिरी पक्षांनी एका आघाडीची घोषणा केली आहे. ही आघाडी कलम ३७० च्या मागणीसांठी संबंधित सर्व पक्षांशी चर्चा सुरू करणार आहे.
यासाठीची बैठक नॅशनल कॉन्फ्रन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीला पीडीपीच्या अध्यक्षा महेबुबा मुफ्ती, पीपल्स कॉन्फ्रन्सचे सज्जाद लोन, पीपल्स मुव्हमेंटचे नेते जावेद मीर आणि माकपाचे नेते मोहम्मद युसूप तारिगामी हे उपस्थित होते.