"कलम 370 हटवलं, पण काश्मीरमध्ये कुणी साधा दगड उचलायची हिंमत केली नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 04:43 PM2023-06-29T16:43:24+5:302023-06-29T16:46:44+5:30
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर सोनिया आणि मनमोहनसिंग यांचं सरकार काहीही उत्तर देत नव्हतं
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भोपाळमधील कार्यक्रमातून समान नागरी कायद्यावर भाष्य केलं. त्यानंतर, देशभरात समान नागरी कायद्यावरुन चर्चा सुरू आहे. त्यातच, देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांवर टीका करताना सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकची आठवण करुन दिली. अमित शहांनी आपल्या भाषणात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला. तर, काँग्रेसलाही लक्ष्य केले. काँग्रेस सरकारमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं जात नव्हतं. मात्र, आता सर्जिकल व एअर स्ट्राईक होत आहेत, असे शहांनी म्हटलं.
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर सोनिया आणि मनमोहनसिंग यांचं सरकार काहीही उत्तर देत नव्हतं. मात्र, मोदींच्या नेतृत्त्वात पुलवामा आणि उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला मोदींनी १० दिवसांतच सर्जिकल स्ट्राईक व एअर स्ट्राईक करुन प्रत्युत्तर दिलंय. पाकिस्तानच्या घरात घुसून त्यांना मारलंय. काँग्रेस, जदयू, आरजेडी आणि ममता हे सर्वचजण कलम ३७० ला लेकराप्रमाणे आपल्या मांडीवर खेळवत होते. हे, म्हणत होते कलम ३७० हटवल्यास काश्मीरमध्ये रक्ताचे पाट वाहतील. पण, राहुल बाबा, मोदींनी कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये रक्ताचे पाट वाहणे तर दूरच, पण साधा दगड उचलायचीही हिंमत कोणी केली नाही, असे म्हणत अमित शहांनी कलम ३७० हटवल्याचं सांगितलं.
पहले जब पाक प्रेरित आतंकवादियों के हमले होते थे तो सोनिया-मनमोहन की सरकार कोई जवाब नहीं देते थे, मौनी बाबा बनकर दिल्ली में बैठ जाते थे लेकिन जब PM मोदी के कार्यकाल में पुलवामा और उरी में हमले हुए तो मोदी जी ने 10 ही दिन में सर्जिकल स्ट्राइक और एयर स्ट्राइक कर पाकिस्तान के घर में… pic.twitter.com/jkxiTzjWIC
— ANI_HindiNews (@AHindinews) June 29, 2023
पक्षाच्या नावाने जे आपला वारसा चालवतात, आज त्यांना भीती आहे. मोदींनी वंशवादाला थारा न देत, विकासवादाला चालना दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत देशाला कणखर बनवलंय. गाव, गरिब, श्रीमंत, महिला, वंचित, शोषित, दलित, युवक या सर्वांना ताकद देत देशाला मजबूत बनवलंय, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी म्हटले.
दरम्यान, सध्या देशात समान नागरी कायदा लागू करण्याच्या हालचाली सुरू असल्याचं दिसून येतंय. यासंदर्भात भोपाळ येथे भाजप कार्यकर्त्यांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवर्जून युसीसीचा उल्लेख केला. तसेच, मुस्लीम बांधवांना आवाहनही केलय, या कायद्याला विरोध करणाऱ्यांवर मोदींनी टीकाही केली.