जम्मू- काश्मीरमधून कलम 370 हटविण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारने घेतला होता. या घटनेची माहिती तरुण मुलांना समजावी यासाठी कलम 370 विषयची माहिती लवकरच शालेय अभ्यासक्रमात समावेश करणार असल्याचे वक्तव्य भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पुण्यातील जन जागरण सभेत केले आहे.
जे. पी. नड्डा म्हणाले की, आपल्या देशातील तरुण पिढीला कलम 370 हटविण्या संर्दभातील निर्णयाची माहिती असणं आवश्यक आहे. तसेच तरुण पिढीने नक्की काय घडले आणि आपण काय केले पाहिजे हे जाणून घेण्यासाठी देखील त्यांचा रस वाढला पाहिजे. त्यामुळे शालेय अभ्याक्रमात याचा समोवेश करण्याचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगतिले.
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारने घेतला होता. प्रस्तावित विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आले होते. यानंतर लोकसभेत कलम 370 वर वादळी चर्चा झाल्यानंतर हे विधेयक 351 विरुद्ध 72 मताधिक्याने पारित झाले होते. त्यानंतर केंद्र सरकारने जम्मू- काश्मीरमधील नागरिकांना देशातील इतर लोकांप्रमाणे अधिकार मिळणार असल्याचे सांगितले. तसेच तेथील निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत असून आता सरकारने जम्मू- काश्मीर आणि लडाखच्या विकासाची आखणी देखील सुरु केली आहे. त्यासाठी जम्मू- काश्मीरमध्ये लवकरच नोकरभरती सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केली होती.