नवी दिल्ली - देशाचे माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपाचे दिवंगत नेते अरुण जेटली यांची आज पहिली पुण्यतिथी आहे. अरुण जेटली यांच्या पहिल्या पुण्यतिथीला पंतप्रधान नरेंद्र मोदींसहभाजपाच्या अन्य वरिष्ठ नेत्यांनी टि्वट करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. जेटलींच्या आठवणींनी मोदी भावूक झाले असून त्यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. "मला माझ्या मित्राची उणीव प्रकर्षाने जाणवतेय" असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचे एक ट्विट केले आहे. "गेल्या वर्षी या दिवशी आपण अरुण जेटलीजी यांना गमावले. मला माझ्या मित्राची उणीव प्रकर्षाने जाणवतेय. त्यांनी मनापासून भारताची सेवा केली. त्यांची बुद्धी, कायदेशीर कौशल्य आणि व्यक्तीमत्वाने ते महान होते" असं म्हणत मोदींनी एक व्हिडीओही शेअर केला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहिली आहे. "अरुण जेटलीजी उत्तम राजकारणी, यशस्वी वक्ते आणि महान व्यक्ती होते. ते बहुआयामी आणि मित्रांचे मित्र होते. विशाल वारसा, परिवर्तनाचा दृष्टीकोन आणि देशभक्तीसाठी त्यांना नेहमी लक्षात ठेवले जाईल" असं शहा यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
कोरोनारूपी संकटाचा नाश करून सर्वांचं मंगल करावं, शरद पवारांचं गणरायाला साकडं
CoronaVirus News : कोरोनाचा धसका! ...म्हणून 'या' देशात शवपेटीत झोपू लागलेत लोक
CoronaVirus News : रशियानंतर 'या' देशाने तयार केली कोरोना लस; आपत्कालीन स्थितीत 2 लसींना मंजुरी