नवी दिल्लीः देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे पहिल्या फळीतील नेते अरुण जेटली यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं 9 ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती खालावतच होती. त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. जेटलींच्या निधनाची बातमी समजल्यानंतर परदेश दौऱ्यावर असलेल्या मोदींनी जेटलींच्या कुटुंबीयांकडे फोन करून दुःख व्यक्त केलं. तसेच जेटलींच्या कुटुंबीयांनी मोदींना परदेश दौरा अर्धवट सोडून भारतात परतू नका, असं सांगितल्याचीही माहितीही मिळाली आहे. जेटलींच्या निधनाची बातमी समजल्यानंतर मोदींनाही अतीव दुःख झालं. बातमी समजल्यानंतर मोदींनी लागलीच जेटलींच्या पत्नी संगीता आणि मुलगा रोहन यांच्याबरोबर फोनवरून संवाद साधला. देशाला प्रगतीच्या पथावर नेण्यासाठी तुम्ही परदेश दौऱ्यावर गेला आहात. त्यामुळे तुम्ही तो दौरा अर्धवट सोडून भारतात परतू नका. कोणत्याही व्यक्तीपेक्षा देश हा सर्वात पहिल्यांदा येतो. म्हणून तुमचा हा दौरा पूर्ण करूनच भारतात परता, अशा शब्दांमध्ये रोहन जेटलींनी मोदींकडे भावना व्यक्त केल्या. तसेच जेटलींसारखा चांगला मित्र गमावल्याची भावनाही मोदींनी व्यक्त केली.
Arun Jaitley Death: अरुण जेटलींच्या मुलानं मोदींना दिलेला निरोप वाचून त्याचा अभिमान वाटेल!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 3:54 PM
देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे पहिल्या फळीतील नेते अरुण जेटली यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले
ठळक मुद्देपरदेश दौऱ्यावर असलेल्या मोदींनी जेटलींच्या कुटुंबीयांकडे फोन करून दुःख व्यक्त केलं.जेटलींच्या कुटुंबीयांनी मोदींना परदेश दौरा अर्धवट सोडून भारतात परतू नका, असं सांगितल्याचीही माहितीही मिळाली आहे. जेटलींसारखा चांगला मित्र गमावल्याची भावनाही मोदींनी व्यक्त केली.