नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज पुन्हा अर्थमंत्रालयाची जबाबदारी स्वीकारली आहे. अरुण जेटली यांच्याकडून आलेल्या अधिकृत पत्रामध्ये, 'मला अर्थ आणि कार्पोरेट अफेअर्स मंत्रालयांची जबाबदारी देण्यात यावी असे राष्ट्रपतींनी पंतप्रधानांना सूचित केल्याचे' नमूद केले आहे. शस्त्रक्रीयेसाठी अरुण जेटली यांनी अर्थमंत्रालयाच्या जबाबदारीतून सुटी घेतली होती. या काळामध्ये पीयूष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर अरुण जेटली यांनी पुन्हा स्वीकारला पदभार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 12:33 PM